iPhone मध्ये नसते अँड्रॉइड फोन मध्ये मिळणारे ‘हे’ बेसिक फिचर, कारण जाणून तुम्हालाही बसणार धक्का

Tejas B Shelar
Published:
iPhone Vs Android Phone

iPhone Vs Android Phone : भारतासहित संपूर्ण जगभरात एप्पलच्या आयफोनची चर्चा पाहायला मिळते. आयफोन मध्ये असणारे जबरदस्त फिचर्स आणि याचे प्रीमियम लूक पाहता अनेक जण आयफोन खरेदीला प्राधान्य देतात. कदाचित तुमच्याकडेही आयफोन असेल किंवा तुम्ही नजीकच्या भविष्यात आयफोन खरेदी करण्याच्या तयारीत असणार. दरम्यान जर तुम्ही नवीन आयफोन घेणार असाल किंवा तुमच्याकडे आधीच आयफोन असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.

खरेतर आयफोनच्या किमती या साधारण अँड्रॉइड फोनपेक्षा अधिक असतात. तरीही अनेकजण आयफोन मध्ये असणारे सेफ्टी फीचर्स पाहता ॲपलचा हँडसेट खरेदी करत असतात. तुम्हाला आयफोन मध्ये असे अनेक फीचर्स पाहायला मिळतील जे की इतर फोन मध्ये उपलब्ध नसतात. मात्र या सर्व गुणसंपन्न आयफोन मध्ये अँड्रॉइड फोन मध्ये असणारे एक बेसिक फीचर उपलब्ध नसते.

कदाचित तुम्ही याकडे लक्ष दिलेले नसेल मात्र आयफोन मध्ये अँड्रॉइड मध्ये सहजतेने उपलब्ध होणारे एक बेसिक फीचर उपलब्ध नसते. दरम्यान आज आपण आयफोनमध्ये अँड्रॉइडचे कोणते फिचर नसते याविषयी जाणून घेणार आहोत. तसेच यामागील कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अँड्रॉइडचे कोणते फीचर आयफोनमध्ये मिळत नाही

खरंतर अगदी सात-आठ हजाराच्या फोन मध्ये उपलब्ध असणारे एक बेसिक सेक्युरिटी फीचर आयफोन मध्ये नसते. तुम्ही कोणताही अँड्रॉइड फोन घेतला तर त्यामध्ये तुम्हाला सेक्युरिटी पॅटर्न फिचर उपलब्ध होणार आहे. मात्र आयफोन मध्ये हे फीचर नसते.

सेक्युरिटी पॅटर्न फीचर जगभरातील जवळपास सर्वच अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये आढळते. मग तो 7-8 हजाराचा स्वस्त फोन असो किंवा लाखों रुपयांचा सर्वात महाग अँड्रॉइड फोन असो प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये हे फिचर दिले जाते.

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक करण्यासाठी सर्वजण या फीचर चा वापर करतात. हे अँड्रॉइड फोन मधील एक मूलभूत सेक्युरिटी फीचर म्हणून ओळखले जाते. परंतु ऍपल आपल्या कोणत्याचं आयफोनमध्ये अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे मूलभूत पॅटर्न फिचर प्रदान करत नाही.

Apple वापरकर्त्यांना त्यांचा iPhone लॉक अन अनलॉक करण्यासाठी फक्त पासकोड, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीचा पर्याय दिलेला असतो.

आयफोन युजर्सना पॅटर्न लॉक फीचर मिळत नाही.

पण तुम्ही ऍपल आयफोनमध्ये पॅटर्न लॉक फीचर का देत नाही याचा कधी विचार केला आहे का? नाही ना मग यामागे नेमके कारण काय आहे. अँड्रॉइड पेक्षा कितीतरी पटीने अधिक महाग असणाऱ्या आयफोन मध्ये हे फिचर का दिले जात नाही? याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

पॅटर्न लॉक फिचरन देण्याचे नेमके कारण काय ?

पासकोडपेक्षा पॅटर्न अनलॉक लक्षात ठेवणे खूप सोपे आहे आणि यासोबतच पॅटर्न लॉक ऍक्सेस करणे देखील सोपे असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एकदाही पॅटर्न तयार करताना पाहिले, तर तो ते सहजपणे लक्षात ठेवू शकतो आणि नंतर तुमच्या फोनमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.

दुसरीकडे, पासकोड त्वरीत प्रविष्ट केला जाऊ शकतो आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी त्वरित लक्षात ठेवणे देखील खूप कठीण आहे. यामुळे आयफोनमध्ये पॅटर्न लॉक नसतो. आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करून एप्पल आपल्या आयफोन मध्ये अँड्रॉइड फोन मध्ये सहजतेने उपलब्ध असणारे हे फीचर देत नसल्याचा दावा केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe