iQOO ने भारतीय बाजारात एकाच वेळी दोन नवीन स्मार्टफोन iQOO Z10 आणि iQOO Z10x लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन त्यांच्या मोठी बॅटरी, AI फीचर्स आणि सुपरफास्ट प्रोसेसरमुळे चर्चेत आले आहेत. या फोनची किंमतही विविध बजेट्समध्ये ठेवण्यात आली आहे, त्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतात.
जर तुमचा बजेट कमी असेल आणि तरीही चांगला परफॉर्मन्स हवा असेल, तर iQOO Z10x उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्हाला प्रीमियम फीचर्ससह मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि अधिक शक्तिशाली प्रोसेसर हवा असेल, तर iQOO Z10 हा योग्य निवड ठरू शकतो. दोन्ही फोनमध्ये AI आधारित स्मार्ट फीचर्स दिले असल्यामुळे, वापर अधिक सोपा आणि स्मार्ट होतो.

iQOO Z10 चे खास वैशिष्ट्य
iQOO Z10 मध्ये 6.77 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स ब्राइटनेससह येतो. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 हा आधुनिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी उत्तम कामगिरी करतो.
फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या फोनमध्ये 7300mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात AI नोट्स असिस्ट, AI सर्च, डॉक्युमेंट स्कॅन आणि इरेज यांसारखी स्मार्ट फीचर्स दिली आहेत.
iQOO Z10x मध्ये काय खास आहे?
iQOO Z10x मध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी+ LCD डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 1050 निट्स ब्राइटनेससह येतो. टच सॅम्पलिंग रेट 240Hz असल्यामुळे गेमिंग अनुभव अधिक उत्तम होतो.
या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर वापरला आहे. कॅमेरा विभागात 50MP + 2MP चा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप तर 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. बॅटरी 6500mAh क्षमतेची असून ती 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z10 आणि Z10x ची भारतात किंमत
iQOO Z10x च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत ₹13,499 पासून सुरू होते. त्याचे इतर पर्याय ₹14,999 आणि ₹16,499 मध्ये उपलब्ध आहेत. iQOO Z10 च्या बेस मॉडेलची किंमत ₹21,999 असून त्याचे इतर पर्याय ₹23,999 आणि ₹25,999 मध्ये येतात. Z10x ची विक्री 22 एप्रिलपासून तर Z10 ची विक्री 16 एप्रिलपासून iQOO च्या वेबसाइट आणि Amazon वर सुरू झाली आहे.