iQOO Z10 की Z10x?, दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स सरस; भारतात कधी होणार लाँच?

iQOO Z10 आणि Z10x हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात 11 एप्रिलला लाँच होत असून, त्यांची प्रोसेसर, बॅटरी आणि डिझाईन यामध्ये मोठा फरक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या या फोन्सची मार्केटमध्ये जोरदार चर्चा आहे.

Updated on -

iQOO Z10 vs Z10x | 11 एप्रिल रोजी iQOO Z10 आणि Z10x हे दोन स्मार्टफोन भारतात अधिकृत लाँच होणार आहे. लाँचपूर्वीच या दोन्ही डिव्हाइसेसची महत्त्वाची स्पेसिफिकेशन्स उघड झाल्या असून, ग्राहकांसाठी कोणता पर्याय जास्त उपयुक्त ठरेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

iQOO ने Z10 मालिका लाँच करण्यापूर्वीच या दोन्ही स्मार्टफोनचे महत्त्वाचे तपशील जाहीर केले आहेत. Z10 आणि Z10x या दोन्ही मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या प्रोसेसरपासून ते बॅटरी क्षमतेपर्यंत मोठे फरक आहेत. या तुलनेतून कोणता फोन निवडायचा हे ठरवणे अधिक सोपे होईल.

Z10x मध्ये खास काय?

iQOO Z10x मध्ये MediaTek Dimensity 7300 हा 4nm फॅब्रिकेशनवर आधारित चिपसेट दिला जाणार आहे. AnTuTu बेंचमार्कवर याने सुमारे 7,28,000 स्कोअर मिळवला आहे. हा फोन 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये 6,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळेल, जी दीर्घकाळ टिकणारी असेल.

Z10 मधील फीचर्स-

तर iQOO Z10 मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर मिळणार आहे. AnTuTu वर याने 8,20,000 स्कोअर मिळवला असून, हे मॉडेल पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत पुढे आहे. यामध्ये 7,300mAh क्षमतेची बॅटरी असून, 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. स्क्रीन क्वाड-कर्व्ह डिझाइनमध्ये असून, 5,000 nits ब्राइटनेससह अतिशय चमकदार आणि आकर्षक डिस्प्ले मिळेल.

डिझाईन्स कशी असेल?

Z10x मध्ये फ्लॅट डिझाइन, आयताकृती कॅमेरा मॉड्यूल, वर्तुळाकार फ्लॅश आणि निळा रंग मिळेल. याउलट, Z10 मध्ये अधिक प्रीमियम लुक आहे – ग्लेशियर सिल्व्हर आणि स्टेलर ब्लॅक रंग, कॅमेरा मॉड्यूल, आणि केवळ 7.8mm जाडीचे शरीर, जे स्लीक आणि एलिगंट दिसते. दोन्ही फोन आपापल्या श्रेणीत उत्कृष्ट पर्याय आहेत. Z10 हे पॉवर युजर्ससाठी योग्य ठरेल, तर Z10x हे बॅलन्स्ड परफॉर्मन्स व बॅटरीसाठी चांगले ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News