Jio Cheapest Recharge Plan : जिओचा पैसा वसूल प्लॅन! सादर केला स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळणार 11 महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा…

Jio Cheapest Recharge Plan

Jio Cheapest Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते. तसेच जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे जिओ ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.

रिलायन्स जिओने जेव्हापासून टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे तेव्हापासून ग्राहकांच्या फायद्याचे अनेक स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. तसेच ग्राहकांना दिवसेंदिवस अनेक ऑफर देखील दिल्या जात आहेत. तसेच सध्या इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओ कंपनीचे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत.

जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्तपासून ते सर्वात महागडे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज प्लॅन निवडू शकतात. आताही जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी सरावात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे.

जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी ११ महिन्यांची वैधता असलेला स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. तसेच अनेक सेवांचा मोफत लाभ दिला जात आहे. जिओकडून हा रिचार्ज प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे.

रिचार्जमध्ये सर्वात मोठा फायदा

जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 1550 रुपये किमतीचा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक मोफत फायदे दिले जात आहेत. तसेच या प्लॅनची वैधता देखील ११ महिन्यांची आहे. एकदा हा रिचार्ज केला तर तुम्हाला दरमहा रिचार्ज करावा लागणार नाही.

डेटा 11 महिन्यांसाठी उपलब्ध असेल

जिओच्या 1550 रुपयांमध्ये ग्राहकांना 11 महिन्यांसाठी कोणत्याही नेटवर्कवर 24 तास अमर्यादित मोफत कॉलिंगचा लाभ दिला जात आहे. तसेच संपूर्ण रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 24GB डेटा देण्यात येत आहे. जिओ ग्राहक एका महिन्यामध्ये 2GB डेटा वापरू शकतात. ज्या ग्राहकांना कमी डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी हा रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

या रिचार्ज प्लॅनसोबत ग्राहकांना 3600 एसएमएस सुविधा देखील दिली जात आहे. यासोबतच तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Cloud च्या सबस्क्रिप्शनचा अतिरिक्त फायदाही मोफत दिला जात आहे. ज्या ग्राहकांच्या परिसरात 5G नेटवर्क आहे अशा ग्राहकांना मोफत अनलिमिटेड 5G डेटा दिला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe