Jio Cheapest Recharge Plan : जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! प्रतिदिन 7.5 रुपयांत मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेटा

Content Team
Published:
Jio Cheapest Recharge Plan

Jio Cheapest Recharge Plan : टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना अनेक स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे रिलायन्स जिओकडे अनेक नवीन ग्राहक देखील आकर्षित होत आहेत. आता जिओकडून ग्राहकांसाठी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे.

जीवच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे देशातील लाखो जिओ ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. कमी दारात रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या पैशांची देखील बचत होत आहेर. तसेच त्यांना या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे देखील मिळत आहेत.

जिओकडून ग्राहकांची विशेष काळजी घेत कंपनी अनेक OTT प्लॅटफॉर्मसाठी अधिक दिवसांची वैधता, डेटा आणि विनामूल्य सदस्यता लाभांसह स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करत आहे.

कंपनीकडून आता जिओ ग्राहकांसाठी 2,545 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची मुदत जवळपास वर्षभरासाठी देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना फक्त 2,545 रुपयांच्या रिचार्जमध्ये वर्षभर सेवा दिली जात आहे.

Jio 2545 रुपयांचा प्रीपेड प्लॅनचे फायदे

जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 2545 रुपयांचा रिचार्ज प्लॅन वर्षभरासाठी सादर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. तसेच दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येत आहे.

या रिचार्जच्या पूर्ण कालावधीमध्ये ग्राहकांना एकूण 504 GB डेटा देण्यात येत आहे. हा रिचार्ज प्लॅन 5G डेटासह येतो. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा देण्यात येत आहे.

2,545 रुपयांच्या रिचार्जमध्ये जिओ ग्राहकांना दररोज 100 एसएमएस चा फायदा देखील दिला जात आहे. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर विनामूल्य सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

या रिचार्ज प्लॅनमध्ये प्रतिदिन किती रुपये खर्च होईल

जिओने ग्राहकांना 2,545 रुपयांमध्ये जवळपास वर्षभर सेवा दिली जात आहे. अमर्यादित कॉलिंगसह डेटा आणि इतर फायदे देखील दिले जात आहेत. जर तुम्ही दररोच्या खर्चाचा विचार केला तर तुम्हाला 7.57 रुपये प्रतिदिन खर्च येईल. तसेच 28 दिवसांचा खर्च 212 रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe