Jio Cheapest Recharge Plan : देशातील सर्वात टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपनी जिओने पहिल्यापासूनच ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.
रिलायन्स जिओ कंपनीकडून ग्राहकांना आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक या रिचार्ज प्लॅनचा वापर करून वर्षभर त्याचा लाभ घेऊ शकतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत.
रिलायन्स जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 895 रुपयांचा प्लॅन वर्षभर चालणारा स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. ग्राहक हा रिचार्ज करून वर्षभर दरमहा रिचार्ज करण्यापासून मुक्त होतील.
जिओ ग्राहकांना दिवसेंदिवस स्वस्त रिचार्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांचा मोठा फायदा तर होतच आहे मात्र पैशांची बचत देखील होत आहे. ग्राहकांचा विचार करता आता कंपनीकडून 895 रुपयांचा वर्षभर चालणारा प्लॅन सादर करण्यात आला आहे.
जिओ दीर्घ वैधता रिचार्ज प्लॅन
जिओकडून सादर करण्यात आलेल्या 895 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे दिले जात आहेत. या रिचार्ज पालनमध्ये ग्राहकांना 24GB डेटा दिला जात आहे. तसेच दररोज ५० एसएमएसचा फायदा देखील दिला जात आहे. यासोबतच ग्राहकांना अमर्यादित कॉलचा लाभ देखील दिला जात आहे. ग्राहकांना २८ दिवसांच्या प्लॅनचे १२ प्लॅन दिले जातात.
जिओ ग्राहकांना दर २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा दिला जातो. तसेच ग्राहकांना Jio TV, Jio Cinema, Jio Security चे मोफत सब्सक्रिप्शन दिले जात आहे. कंपनीकडून हा रिचार्ज प्लॅन फक्त त्यांच्या जिओ फोन वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आला आहे. जर तुम्ही जिओ फोन वापरकर्त्ये असाल तर तुम्हीही या स्वस्त रिचार्ज प्लॅनचा फायदा घेऊ शकता.
तसेच जर तुम्हाला वार्षिक रिचार्ज प्लॅन नको असेल तर तुम्ही ९१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा फायदा घेऊ शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS चा २८ दिवसांसाठी लाभ दिला जात आहे. तसेच ग्राहकांना दररोज 0.1MB डेटा देखील दिला जात आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह कंपनीकडून ग्राहकांना 3GB डेटा दिला जात आहे.