Jio prepaid plans | जर तुम्ही दीर्घकालीन आणि फायद्याचा प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर Jio चे काही उत्तम पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. खास करून 1,300 रुपयांपेक्षा कमी किमतीत जिओचे असे काही प्लॅन्स आहेत जे तुम्हाला केवळ दररोज 2GB डेटा देत नाहीत, तर विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मोफत अॅक्सेस देखील देतात. हे प्लॅन्स 84 ते 98 दिवसांच्या वैधतेसह येतात आणि त्यात अमर्यादित कॉलिंग, मोफत SMS आणि मनोरंजनाच्या सुविधा देखील मिळतात.
Jio चा 899 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 20GB अतिरिक्त डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि Disney+ Hotstar चा मोफत अॅक्सेस देखील उपलब्ध आहे.

जिओचे प्लॅन्स किंमतीसह-
949 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आहे. यामध्ये देखील दररोज 2GB डेटा मिळतो आणि संपूर्ण भारतात अमर्यादित कॉल करता येतो. यासह, Hotstar चा अॅक्सेस दिला जातो.
999 रुपयांचा प्लॅन 98 दिवसांसाठी असून यामध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि Disney+ Hotstar अॅक्सेस दिला जातो. हा दीर्घकालीन प्लॅन त्याच्या व्याप्त सेवांमुळे खूप लोकप्रिय आहे.
1028 आणि 1029 रुपयांचे प्लॅन्स देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतात. या प्लॅन्समध्ये दररोज 2GB डेटा, Hotstar चा मोफत अॅक्सेस आणि अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 SMS ही सुविधा मिळते. विशेषतः 1029 रुपयांच्या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite देखील मोफत मिळते.
Jio चा सर्वात प्रीमियम 1,299 रुपयांचा प्लॅन Netflix, Disney+ Hotstar आणि JioCinema चा फ्री अॅक्सेस देतो. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा आहे.
हे सर्व प्लॅन्स MyJio App किंवा अधिकृत Jio वेबसाइटवरून सहज रिचार्ज करता येतात. कमी बजेटमध्ये अधिक फायदे मिळवायचे असतील तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतात.