Jio Prepaid Plan : जर तुम्ही कमी किमतीत दीर्घ वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करणारा रिचार्ज प्लॅनच्या शोधत असाल, तर, रिलायन्स जिओचा हा भन्नाट प्लॅन तुमच्यासाठीच आहे. इतकेच नाही तर कंपनी यात 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे.
कंपनीने आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन हा रिचार्ज प्लॅन आणला आहे. जर तुम्ही दररोज खूप इंटरनेट वापरत असाल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत 365 दिवसांची आहे.
जिओचा 2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
कंपनीचा हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. मात्र ग्राहकांना या प्लॅनमध्ये 23 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात असल्याने त्याची एकूण वैधता 388 दिवसांची होते. जर रिचार्ज प्लॅनच्या किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 2999 रुपये इतकी आहे.
तसे पहिले तर या प्लॅनमधील दैनंदिन खर्च एकूण 7 रुपये इतका आहे. या मध्ये दररोज 2.5GB डेटा मिळत असला तरी कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 75GB अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे, त्यामुळे संपूर्ण वैधता दरम्यान, ग्राहकांना 987.5 GB (912.5 GB + 75GB) 4G डेटा मिळत आहे. इतकेच नाही तर संपूर्ण वैधतेदरम्यान प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत.
तसेच अतिरिक्त फायदे म्हणून, हा प्लॅन Jio TV, Jio Cinema सारख्या Jio अॅप्समध्ये प्रवेश देतो. चांगली गोष्ट म्हणजे कंपनी पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देत आहे.
एअरटेलचा 2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SSM ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Apollo 24/7 सर्कल सबस्क्रिप्शन, मोफत Hellotunes आणि 3 महिन्यांसाठी मोफत Wynk Music सबस्क्रिप्शन यांचा समावेश आहे.
समजा तुम्ही एअरटेलचे 5G नेटवर्क लाइव्ह असणाऱ्या भागात राहत असाल आणि तुम्ही 5G फोन वापरत असल्यास तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकता. तसे पहिले तर जिओचा हा प्लॅन अतिरिक्त डेटा आणि वैधतेसह पैशासाठी जास्त मूल्यवान आहे.