Jio Prepaid Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील आघडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे ग्राहकवर्गाची संख्या खूप जास्त आहे. अशातच कंपनी आपल्या ग्राहकांच्या हितासाठी अनेक रिचार्ज प्लॅन आणत असते.
कंपनीचे पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन खूप लोकप्रिय आहेत. असेच दोन प्लॅन कंपनीने आणले आहेत, ज्यामध्ये कंपनीच्या ग्राहकांना 34GB अधिक डेटा, मोफत कॉल तसेच बरेच काही मिळत आहे. तेही अवघ्या 100 रुपयांमध्ये. काय आहेत कंपनीचे हे रिचार्ज प्लॅन? जाणून घ्या.
कंपनीचा 299 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
कंपनी आपल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा देत आहे. जर याच्या वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. तसेच व्हॉईस कॉलिंगसाठी कंपनीच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येत आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस दिले जातात. या मध्ये एकूण 56GB डेटा दिला जात आहे. इतर फायदे म्हणून, कंपनीकडून या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.
कंपनीचा 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
ग्राहकांना रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये त्यांना दररोज 3GB डेटा मिळत आहे. एकंदरीतच ग्राहकांना 28 दिवसांत एकूण 84GB डेटा दिला जाईल. तसेच तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉल्सचाही लाभ देण्यात येत आहे.
कंपनी या प्लॅनमध्ये ग्राहकांना 61 रुपयांचे व्हाउचर देत असून ज्याचा वापर करून तुम्ही 6GB अतिरिक्त डेटा मिळवू शकता. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 90GB डेटा उपलब्ध असणार आहे. शिवाय या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioSecurity सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
जाणून घ्या दोन्ही प्लॅनमधील फरक
कंपनीच्या या दोन प्लॅनमधील फरक फक्त डेटाचा आहे. कारण ग्राहकांना 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56GB डेटा आणि 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90GB डेटा मिळत आहे. तुम्हाला 100 रुपयांमध्ये 34GB डेटा मिळत असून म्हणजेच तुम्हाला 3 रुपयांपेक्षा कमी किमतीत 1GB डेटाचा लाभ घेता येईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS यासारखे इतर सर्व फायदे सामान्य आहेत.