Jio Recharge Plan : Vi आणि Airtel ला टक्कर देतो जिओचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन! अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात अनेक फायदे

Published on -

Jio Recharge Plan : देशात रिलायन्स जिओ, Vi आणि Airtel या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यापैकी जिओ ही सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची कंपनी. आहे. आपल्या ग्राहकांसाठी सतत अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणत असते.

असाच एक कंपनीने प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे, जो Vi आणि Airtel ला टक्कर देतो. यात ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. त्याशिवाय कंपनीच्या ग्राहकांना JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. 336 दिवसांच्या वैधतेसह कंपनीचा रिचार्ज प्लॅन येतो.

रिलायन्स जिओचा 2545 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

दिग्गज लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या सर्व वापरकर्त्याची खूप काळजी घेते. कंपनीच्या 2545 रुपयांच्या या शानदार प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची वैधता देण्यात येत आहे. या शानदार प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी ग्राहकांना प्रत्येक दिवसाला एकूण १.५ जीबी डेटा कंपनीकडून दिला जात आहे.

अशा प्रकारे कंपनीच्या ग्राहकांना आता एकूण 504 GB डेटा घेता येईल. या प्लॅनमध्ये बोलण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही फोनवर तासन् तास बोलता येईल.

तसेच जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. आता तुम्हाला जर प्रत्येक महिन्याला रिचार्जच्या कटकटीतून सुटका पाहिजे असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग कमी करून 64 Kbps केला जाईल. यात ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देखील देण्यात येत आहे. इतकेच नाही आता तुम्ही मोफत टीव्ही पाहू शकता, कारण JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.

कंपनीचा हा खास प्लॅन अशा लोकांसाठी खूप चांगला आहे ज्यांना दररोज जास्त डेटाची गरज असते. अजूनही काहीजण असे आहेत जे घरून काम करत आहेत. जरी अनेक लोकांच्या घरात वायफाय सुविधा असली तरी तुमच्याकडे वायफाय नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News