Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते, त्यामुळे ती इतर कंपन्यांना टक्कर देत असते.
जर तुम्हीही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने काही रिचार्ज प्लॅन आणले आहेत, जे 56 दिवसांच्या वैधतेसह येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनच्या किमती कमी असून यात तुम्हाला कॉलिंगसह डेटाचा आनंद घेता येईल.
रिलायन्स जिओकडून ऑफर करण्यात आलेल्या 56 दिवसांच्या वैधतेच्या रिचार्ज योजना वेगवेगळ्या श्रेणींचा भाग आहेत. कंपनी आता 533 रुपये, 589 रुपये, 479 रुपये आणि 529 रुपये अशा वेगवेगळ्या किंमती योजना ऑफर करत आहे. त्यापैकी काही रिचार्ज प्लॅन 1.5GB डेटा देतात तर काही प्लॅन्स 2GB दैनिक डेटा देतात. तसेच कंपनी JioSaavn Pro चे सदस्यत्व निवडक प्लॅनसह ऑफर केले जात आहे.
जिओचा 533 रुपयांचा प्लॅन
या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळत असून सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग फायदे मिळत आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस शिवाय, JioTV, JioCinema आणि JioCloud सारख्या सेवांमध्ये प्रवेश दिला जात आहे.
जिओचा 589 रुपयांचा प्लॅन
वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो आणि ते सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. JioSaavn Pro सबस्क्रिप्शन शिवाय, या प्लॅनसह रिचार्ज केला तर JioTV, JioCloud आणि JioCinema वर प्रवेश मिळतो.
जिओचा 479 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये एकूण 1.5GB डेटा उपलब्ध असून जो 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ सर्व नेटवर्कवर उपलब्ध आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांसाठी JioTV, JioCloud आणि JioCinema सबस्क्रिप्शन ऑफर करतो.
जिओचा 529 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगशिवाय दररोज 100 एसएमएस मिळतात. हा प्लॅन 1.5GB दैनिक डेटा देतो. या रिचार्ज प्लॅनसह, JioSaavn Pro, JioTV, JioCinema आणि JioCloud सेवांचा ॲक्सेस 56 दिवसांसाठी मिळत आहे.