Jio Recharge Plan : रिलायन्स जिओकडे अनेक शानदार प्लॅन आहेत. कंपनी पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅन ऑफर करत असते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. प्रत्येक प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे मिळतात.
सध्या कंपनीचा असाच एक प्लॅन आहे ज्यात तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटासह 1 वर्षासाठी Disney Hotstar मोफत मिळेल. विशेष म्हणजे कंपनीच्या या प्लॅनची किंमत देखील खूपच कमी आहे, 28 दिवसांच्या रिचार्जवर ही ऑफर मिळत आहे.
समजा तुम्हाला OTT कंटेंट पाहण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी जिओची ही एक उत्तम योजना आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारचे 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.
अनलिमिटेड कॉल आणि दररोज 2GB डेटा
हा रिलायन्स जिओचा 598 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येईल. कंपनीचा हा प्लॅन संपूर्ण वैधतेदरम्यान दररोज 2GB डेटा किंवा एकूण 56GB डेटा ऑफर करेल. इतकेच नाही तर ग्राहकांना या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळत आहेत. समजा तुमचा दैनंदिन डेटा कोटा संपला तरी तुम्ही 64Kbps स्पीडने इंटरनेट वापरणे चालू ठेवू शकता.
डिस्ने प्लस हॉटस्टार
कंपनीच्या या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 वर्षासाठी मोफत Disney Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते. इतकेच नाही तर Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश उपलब्ध आहे.
अनलिमिटेड 5G डेटा
हे लक्षात घ्या की या प्लॅनचे ग्राहक Jio च्या अनलिमिटेड 5G डेटासाठी पात्र असून परंतु तुम्हाला त्याचा फायदा तेव्हाच घेऊ शकाल ज्यावेळी तुमच्या भागात Jio चे 5G कव्हरेज उपलब्ध असेल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल.