Jio Recharge Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीचा हा प्लॅन 2999 रुपये आणि 2879 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये कंपनी अनेक फायदे देत आहे. ज्यात तुम्हाला75GB फ्री डेटा मोफत मिळेल.
तसेच काही पात्र ग्राहकांना यात अतिरिक्त मोफत डेटा मिळत आहे. ज्या ग्राहकांना जास्त इंटरनेटची गरज आहे त्यांच्यासाठी कंपनीचा हा प्लॅन खूप फायद्याचा आहे. यात Jio TV आणि Jio सिनेमाचा मोफत प्रवेश दिले जात आहे. काय आहे कंपनीचा हा प्लॅन, जाणून घेऊयात.
कंपनीचा 2999 रुपयांचा प्लॅन
किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 2999 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच यात तुम्हाला 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी, तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा दिला जात आहे. याची खास गोष्ट म्हणजे कंपनी यामध्ये 75 GB एक्स्ट्रा हाय-स्पीड डेटा देत आहे. तसेच, हा प्लॅन पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा मोफत देत आहे. यामध्ये दररोज 100 मोफत SMS
तसेच देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV आणि Jio सिनेमाचा मोफत प्रवेश मिळेल.
कंपनीचा 2879 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB सोबत 730 GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देण्यात येत आहे. तर डेटा मर्यादा संपल्यानंतर, या प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. यात दररोज 100 मोफत एसएमएस दिले जात आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Security सोबत Jio Clouds मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.