JioBook Laptop : अखेर लाँच झाला जिओचा बहुप्रतीक्षित लॅपटॉप! ‘या’ दिवसापासून 17 हजारांपेक्षा स्वस्तात येईल खरेदी करता

JioBook Laptop

JioBook Laptop : स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉपही खूप गरजेचा झाला आहे. अशातच जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण नुकताच बाजारात जिओचा बहुप्रतीक्षित लॅपटॉप आला आहे.

जो तुम्हाला 17 हजारांपेक्षा कमी किमतीत सहज खरेदी करता येईल. येत्या 5 ऑगस्टपासून तुम्हाला तो अॅमेझॉनवरून आणि ऑफलाइन रिलायन्स डिजिटलमधून खरेदी करता येईल. जाणून घ्या त्याचे फीचर्स.

कंपनीचे असे मत आहे की JioBook मध्ये प्रगत Jio OS ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. त्याची रचना स्टायलिश असून त्यात अनेक मनोरंजक फीचर्स दिली आहेत. जिओबुक सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे. ऑनलाइन क्लासेस किंवा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न जसे की योगा स्टुडिओ सुरू करणे किंवा ऑनलाइन ट्रेडिंग करणे, हा लॅपटॉप तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये मदत करेल.

किती आहे किंमत?

किमतीचा विचार केला तर JioBook लॅपटॉपची किंमत अवघी 16,499 रुपये इतकी आहे. तर तुम्हाला तो 5 ऑगस्टपासून खरेदी करता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. तुम्ही तो अॅमेझॉनवरून आणि ऑफलाइन रिलायन्स डिजिटलमधून खरेदी करू शकता.

लॅपटॉप हार्डवेअर डिटेल्स

नवीन जिओबुक लॅपटॉपमध्ये 11.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात अँटी-ग्लेअर एचडी डिस्प्ले आहे असे कंपनीचे मत आहे. स्टोरेजचा विचार केला तर या लॅपटॉपमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज दिले आहे, जे SD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येईल.

तसेच JioBook कंपनीच्या Jio OS वर काम करते. हा 4G लॅपटॉप असून तो ड्युअल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. यात मॅट फिनिश डिझाइन दिले असून दिसायला हा लॅपटॉप एकदम स्लिम आणि स्टायलिश आहे. तर त्याचे वजन फक्त 990 ग्रॅम इतके आहे, जे खूपच हलके आहे. लॅपटॉप शक्तिशाली ऑक्टा-कोअर प्रोसेसरने सुसज्ज असून त्यावर मल्टीटास्किंग सहजतेने करता येते. इतकेच नाही तर यात इन्फिनिटी कीबोर्ड आणि मोठा ट्रॅकपॅडही दिला आहे. यात यूएसबी, एचडीएमआय आणि ऑडिओ पोर्ट दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe