Apple iPhone 11 आणि iPhone 12 वर सुरु आहे जबरदस्त ऑफर; आजच खरेदी करा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- Apple iPhone 11 आणि iPhone 12 पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. या दोन फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. या फोन्सच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.

तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 49,900 रुपयांत iPhone 11 खरेदी करू शकता. तर Apple iPhone 12 5G हा 53,999 रुपयांना खरेदी करु शकता.

आयफोन 11 वरील ऑफर जाणून घ्या  
64GB व्हेरिएंटची बेसिक किंमत 49,900 रुपये आहे. तुम्ही हा फोन 2,349 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. तसेच, SBI, ICICI, कोटक बँक क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 4,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. याशिवाय अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.

फोनचे फीचर्स
यात 6.1-इंचाचा Liquid Retina HD LCD डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP TrueDepth कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP कॅमेरा दिला आहे. हा फोन A13 Bionic चिपसेटवर काम करतो.

आयफोन 12 वरील ऑफर जाणून घ्या  
64GB व्हेरिएंटची बेसिक किंमत 54,999 रुपये आहे. तुम्ही हा 2,542 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. तसेच, फोनच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर असेल.

फोनचे फीचर्स
हा फोन पाच रंग पर्यायांमध्ये येतो. ज्यात लाल, काळा, निळा, हिरवा, जांभळा आणि पांढरा रंगाचा समावेश आहे. फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे.

फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे. 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12MP ट्रू डेप्थ कॅमेरा देखील देण्यात आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP कॅमेरा असणार आहे. हा फोन A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe