MacBook Air 13-inch : नुकतेच Apple ने आपले मार्केटमध्ये MacBook Air 15-inch हे मॉडेल लाँच केले आहे. परंतु कंपनीकडून हे मॉडेल लाँच होताच MacBook Air 13-inch या मॉडेलची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता तो मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
त्यामुळे आता त्यांची MacBook Air 13-inch खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. दरम्यान ग्राहकांना आता MacBook Air 15-inch हे मॉडेल 13 जून पासून खरेदी करता येणार आहे. ज्याची किंमत 1,34,900 रुपये इतकी आहे. जाणून घ्या सविस्तर
किमतीचा विचार केला तर नुकत्याच लाँच झालेल्या MacBook Air ची किंमत 1,34,900 रुपये इतकी आहे. तुम्ही हा लॅपटॉप भारतात 13 जून पासून खरेदी करू शकता. परंतु या लॅपटॉपच्या लॉन्चच्या वेळी कंपनीने 13 इंच मॉडेलच्या किंमती कमी करण्याची मोठी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.
जाणून घ्या नवीन किंमती
Apple कडून भारतात MacBook Air M2 लाँच करण्यात आले असून त्याची किंमत 1,19,900 रुपये इतकी आहे. त्याचे टॉप व्हेरिएंट म्हणजेच 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1,49,900 रुपये इतकी आहे. या लॅपटॉपच्या किमतीत कपात केल्यास त्याची किंमत 1,14,900 रुपयांपासून सुरू होणार आहे. हे लक्षात घ्या की ही किंमत डिवाइसच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची आहे.
तसेच त्याचा 512GB स्टोरेज प्रकार 1,44,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन किंमती दिसून येत आहेत. तसेच, MacBook Air M1 च्या किमतीत अजूनही कोणता बदल करण्यात आला नाही.
जाणून घ्या फीचर्स
MacBook Air M1 चे उत्तराधिकारी म्हणून कंपनीकडून 13-इंच स्क्रीन आकारासह MacBook Air M2 लाँच करण्यात आला आहे. यात 13.6-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले असून जो 500 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. हा M2 चिपसेटवर काम करत असून स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB रॅम आणि 256GB/512GB स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.
इतकेच नाही तर या लॅपटॉपमध्ये मॅजिक कीबोर्ड दिला आहे. तसेच ग्राहकांना फोर्स टच ट्रॅकपॅड मिळेल. हा लॅपटॉप 1080p फेसटाइम एचडी कॅमेरा, टच आयडी, चार स्पीकर सिस्टम, दोन थंडरबोल्ट पोर्टसह येतो. यात 52.6Wh ची बॅटरी दिली आहे. जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.