Mobile Phones Offers : जर तुम्ही सध्या स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यासाठी ही तुमच्यासाठी योग्य वेळ असू शकते. कारण सध्या विजय सेल्स कडून अनेक फोन्सवर डिस्काऊंट दिला जात आहे.
विजय सेल्स सध्या iPhone, OnePlus, Redmi, Vivo यासह जवळपास सर्व ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट देत आहे. आजच्या या बातमीत आम्ही तुम्हाला विजय सेल्समध्ये उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम डील्सबद्दल सांगणार आहोत. या यादीत OnePlus आणि लोकप्रिय iPhone मॉडेल्सचा समावेश केला आहे.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये iPhone घ्यायचा असेल, iPhone 15 128GB मॉडेलवर 9000 हजाराची सूट दिली जात आहे. कंपनीने हा फोन 79,900 ला लॉन्च केला होता. आता हा फोन तुम्हाला 70,990 मध्ये मिळेल. तसेच आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर आणखी 6,000 रुपयांची सूट आहे, क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 7,500 रुपयांची सूट आहे, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत 63,490 रुपये असेल, म्हणजेच तुम्ही हा फोन अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
iPhone 14 128GB चे 69,900 रुपये किमतीचे मॉडेल विजय सेल्सवर 60,990 रुपयांना म्हणजेच 8,910 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. या मॉडेलवर, तुम्हाला ICICI आणि SBI बँक कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 3,000 रुपयांची सूट मिळेल, तर तुम्हाला अमेरिकन एक्सप्रेस कार्ड ईएमआय आणि वन कार्ड क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 7,500 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे त्याची प्रभावी किंमत 53,490 रुपये असेल, म्हणजेच तुम्ही तो 16,410 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
OnePlus Nord CE4 5G फोनवर देखील सूट मिळत आहे, याच्या 8GB रॅम आणि 256GB वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे, परंतु जर One Card Credit Card EMI ट्रान्झॅक्शनद्वारे खरेदी केला असेल, तर या फोनवर 7,500 रुपयांची सूटही मिळत आहे, ज्यामुळे त्याची प्रभावी किंमत 19,499 रुपये असेल. फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोन Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह येतो आणि 100W चार्जिंग सपोर्ट आहे.
8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह फोनचा व्हेरिएंट विजय सेल्सवर 17,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही या फोनवर वन कार्ड क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहाराद्वारे 7,500 रुपयांची सूट देखील मिळवू शकता, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत 10,499 रुपयांपर्यंत कमी होईल.