Moto G06 Power : नवीन फाईव्ह जी स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची बातमी घेऊन आलो आहोत. खरंतर अलीकडे अनेक कंपन्यांनी लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यातील अनेक मॉडेल्स दहा हजाराच्या आतील आहेत.
दरम्यान जर तुमचेही दहा हजारापेक्षा कमी बजेट असेल तर तुमच्यासाठी मोटोचा एक स्मार्टफोन फायद्याचा ठरणार आहे. फोटोचा हा स्मार्टफोन तुम्हाला फेस्टिवल सीजन मध्ये फक्त 681 रुपयांच्या ईएमआय वर मिळणार आहे. खरे तर मोटोने अलीकडेच Moto G06 Power हँडसेट लाँच केला आहे.

याच मॉडेलची आता विक्री सुरु करण्यात आली आहे. 11 ऑक्टोबरपासून याची विक्री लाईव्ह झाली आहे. ग्राहकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळणार असा अंदाज आहे. ग्राहकांसाठी हा एक किफायतशीर पर्याय राहणार आहे. ज्यांना लो बजेट स्मार्टफोन हवा असेल त्यांच्यासाठी नक्कीच हा पर्याय फायद्याचा राहील.
कोणाला दिवाळीच्या सणाला गिफ्ट द्यायचे असेल तर त्यासाठी हा हँडसेट बेस्ट राहणार आहे. हा एक फाईव जी हँडसेट आहे. तसेच यामध्ये अनेक आधुनिक पिक्चर सुद्धा आहेत. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या साइटवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइटवर ईएमआयचा सुद्धा ऑप्शन उपलब्ध आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना बँक डिस्काउंटचा सुद्धा लाभ मिळणार आहे. हा एक 7000 mAh बॅटरी असणारा पावरफुल स्मार्टफोन आहे. टेंड्रिल, टेपेस्ट्री, लॉरेल ओक या तीन रंगांमध्ये हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.
किंमत किती आहे?
ईएमआयवर हा फोन खरेदी करायचा झाल्यास ग्राहकांना बारा महिन्यांसाठी 681 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. या हँडसेट ची किंमत 7499 असून यावर बँक डिस्काउंट चा लाभ मिळतोय. 4GB + 64 GB स्टोरेज प्रकारात हा हँडसेट कंपनीने अलीकडेच लॉन्च केला होता. आता याची सेलिंग प्रत्यक्षात सुरू झाली आहे.