Motorola E13 : शक्तिशाली फोन आता 40% सवलतीसह करा खरेदी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Motorola E13

Motorola E13 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुम्ही आता स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता. Motorola चा शानदार स्मार्टफोन Motorola E13 40% सवलतीत खरेदी करू शकता.

जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. 5,950 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह फोन तुम्ही खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड, एरिया पिनकोड आणि कंपनी पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या Motorola E13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

तसेच मोटोरोलाच्या या स्वस्त स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंच HD डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. या फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 20:09 च्या आस्पेक्ट रेशोला सपोर्ट करेल. तसेच त्याचा रिफ्रेश दर 60Hz इतका आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

इतकेच नाही तर प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Unisoc T606 देत आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्मार्टफोनची मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देत आहे.

त्याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. फेस अनलॉक फीचर असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 10 वॅट चार्जिंगसह येईल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा फोन Android 13 Go Edition वर काम करेल.

इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, 2.4GHz 5GHz, Wi-Fi हॉटस्पॉट, 4G LTE, Bluetooth 5.0, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत. शक्तिशाली आवाजासाठी, कंपनीने या फोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट दिला आहे. कंपनीचा हा फोन अरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक, क्रीमी व्हाइट आणि लिटल बॉय ब्लू या चार रंगांच्या पर्यायांत तुम्हाला खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe