मोटोरोलाचा फ्लिप फोन आता तुमच्या बजेटमध्ये! Motorola Razr 60 वर मिळतोय 15,000 रुपयांचा डिस्काउंट

Motorola Razr 60 : तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर अलीकडे प्रीमियम स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. सॅमसं, मोटोरोला, एलजी अशा कंपन्या आता प्रीमियम सेगमेंटमध्ये भन्नाट स्मार्टफोन आणत आहेत. यामुळे आता प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या कंपन्यांनी आता ग्राहकांना फोल्डेबल अन फ्लिप फोन उपलब्ध करून दिले आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही असाच प्रीमियम फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. सध्या अमेझॉन, फेसबुकवर सेल सुरू आहेत. या सेलमध्ये असे प्रीमियम स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत मिळू शकतात. अमेझॉनवर सुरू असणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल 40-50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतोय.

फ्लिपकार्ट वर देखील अशीच डिस्काउंट ऑफर सुरू आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजर सेलमध्ये ग्राहकांना मोटरोलाच्या फ्लिप फोनवर तब्बल 15 हजार रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. Motorola Razr 60 फ्लिप फोनवर हा डिस्काउंट ऑफर सुरू असून आज आपण याच ऑफर बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे डिस्काउंट ऑफर

फोल्डेबल फ्लिप फोन घ्यायचा असल्यास मोटोरोलाचा Razr 60 हा एक बेस्ट ऑप्शन आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फोनवर हजारो रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. हा स्मार्टफोन Flipkart वर सर्वात कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. हा फोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा तब्बल 15000 रुपयांनी पहिल्यांदाच स्वस्त झालाय.

कंपनीने हा फोन 54,999 रुपये किंमतीत लॉन्च केला होता. पण फ्लिपकार्टवर हा फोन 39 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 15 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे फ्लॅट डिस्काउंट सोबतच ग्राहकांना बँक ऑफरचा ही लाभ घेता येणार आहे.

बँक ऑफरचा लाभ घेतल्यास ग्राहकांना अतिरिक्त 2000 रुपयांची बचत करता येणार आहे. बँक ऑफरचा लाभ घेतल्यानंतर ग्राहकांना हा फोन फक्त 37,999 रुपयांत मिळू शकतो. याशिवाय, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यामुळे जर तुम्हाला मोटोचा हा फ्लिप फोन घ्यायचा असेल तर फ्लिपकार्टचा सेल तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. मोटोरोला Razr 60 मध्ये 6.9-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. तसेच बाहेरील कव्हरवर 3.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले असून तो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.

स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास विक्टस आहे. हा फोन MediaTek Dimensity 7400X प्रोसेसरवर चालतोय. 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये हा फोन लाँच झालाय. ह्या डिव्हाइसमध्ये 50MP + 13MP असा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe