New FastTag Rule:- गाडी चालवताना फास्टॅगची माहिती असणे महत्वाचे आहे. पण केवळ माहिती असणे पुरेसे नाही. फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात आणि त्यामुळे अपडेट राहणे आवश्यक आहे.
सरकार आणि संबंधित संस्थांचा उद्देश टोल प्लाझावर पेमेंट प्रक्रियेला अधिक सोयीस्कर आणि त्वरित बनवणे आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा सतत पुढाकार आहे. ज्यामुळे टोल वसुली अधिक सुलभ आणि त्रासमुक्त होईल.
आता एक महत्त्वाचा बदल 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने जाहीर केले आहे की, राज्यातील सर्व वाहनांवर फास्टॅग अनिवार्य असेल. याआधी महाराष्ट्रामध्ये फास्टॅगची सक्ती नव्हती.
पण आता त्यात बदल करण्यात आला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते.परंतु महाराष्ट्रात काही प्रमाणात सूट होती. पण 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी फास्टॅग असणे आवश्यक होईल.
नियमाचे पालन न केल्यास काय?
1 एप्रिलपासून जर तुमच्या गाडीत फास्टॅग नसेल तर तुम्हाला दंड म्हणून दुप्पट टोल भरावा लागेल. म्हणून तुमच्या गाडीवर लवकरात लवकर फास्टॅग बसवणे महत्वाचे आहे.
फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग एक छोटा इलेक्ट्रॉनिक आरएफआयडी टॅग आहे.जो गाडीच्या विंडशील्डवर लावला जातो. हा टॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनाचे तपशील वाचतो.
यामुळे गाडी चालवताना टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता नाही आणि टोल अगदी सहजपणे आणि झटपट भरता येतो. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो आणि टोल वसुली प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी बनते.
फास्टॅग हे लोकांना त्यांच्या प्रवासात सुलभता आणि सुविधा देण्यासाठी एक उत्तम उपाय ठरले आहे. 1 एप्रिलपासून याचे पालन करणे अनिवार्य होईल. त्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा घ्या आणि टोल वसूली प्रक्रियेला अधिक चांगले आणि जलद बनवा.