Nothing च्या CMF Phone 2 Pro मध्ये असणार ‘Everything’; लाँचआधीच किंमत आणि फीचर्समुळे मार्केटमध्ये खळबळ

Published on -

CMF Phone 2 Pro : नथिंग कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सबाबत उत्सुकता वाढली असून, आता CMF फोन 2 प्रो मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रो चिपसेट वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत, या इव्हेंटमध्ये CMF फोन 2 देखील सादर केला जाण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लाँच होणार असल्याचे संकेत आहेत.

CMF फोन 2 प्रो च्या अनेक लीक आणि टीझरमुळे याचे बरेच तपशील समोर आले आहेत. गेल्या वर्षी लाँच झालेल्या CMF फोन 1 नंतर यावेळी प्रो व्हर्जन घेऊन येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच साधा CMF फोन 2 सुद्धा लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे. काही रिपोर्टनुसार, नथिंग 28 एप्रिल रोजी दोन स्मार्टफोन लाँच करेल – CMF फोन 2 आणि CMF फोन 2 प्रो.

CMF Phone 2 Pro आणि CMF Phone 2 Pro

कंपनीने CMF फोन 2 प्रो मध्ये MediaTek चा Dimensity 7300 प्रो चिपसेट देण्यात येईल, हे अधिकृतरित्या सांगितले आहे. नथिंगनुसार, या नव्या चिपसेटमुळे CMF फोन 1 च्या तुलनेत 10 टक्के जास्त CPU परफॉर्मन्स मिळेल आणि ग्राफिक्स कामगिरीत 5 टक्क्यांची वाढ होईल. गेमिंगसाठी देखील या फोनमध्ये खास वैशिष्ट्ये असतील. कंपनीचा दावा आहे की हा फोन BGMI गेममध्ये 120 FPS पर्यंतचा अनुभव देईल, तसेच नेटवर्क बूस्ट 53 टक्क्यांपर्यंत असेल. टच सॅम्पलिंग रेट 1000Hz इतका असल्यामुळे गेमिंगसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

नथिंग इंडियाचे अध्यक्ष अकिस इव्हँजेलिडिस यांनी देखील याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की CMF फोन 2 प्रो बॉक्समध्ये चार्जर अडॉप्टरसह येईल. मागील काही वर्षांत अनेक ब्रँड्सनी बॉक्समध्ये चार्जर देणे बंद केले होते, परंतु नथिंग कंपनीने हा ट्रेंड मोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगळा चार्जर खरेदी करावा लागणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe