PAYTM Train Ticket Booking : आता मिळणार कन्फर्म ट्रेन टिकट, पेटीएमने आणले हे नवीन फिचर..

Ahmednagarlive24 office
Published:

PAYTM Train Ticket Booking : नुकतीच दिवाळी सुरु झाली असून, लवकरच छठ पूजाही जवळ येईल. दरम्यान, सणांसाठी सर्वांची घरी जाण्याची लगबग सुरु होते. मात्र अनेकदा ट्रेन तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे अनेक अडचणी येतात. मात्र तुमच्या या अडचणींवर आता पेटीएमने उपाय शोधला असून, आता तुम्ही पेटीएमने आपले ट्रेन तिकीट कन्फर्म करू शकता. जाणून घ्या याबद्दल.

सण सुरु झाले असून, दिवाळी नंतर लगेच छठ असे अनेक सण येत आहेत. यावेळी सर्वाना आपल्या घरी जाण्याची घाई असते. घरी जाण्यासाठी आपल्या ट्रेनचे तिकीट कन्फर्म व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा लोकांना मदत करण्यासाठी पेटीएमने एक नवीन फीचर आणले आहे.

पेटीएमच्या या फीचर्सच्या मदतीने युजर्स ट्रेनचे तिकीट सहज बुक करू शकतील. पेटीएमच्या या वैशिष्ट्यामुळे ट्रॅव्हल एजंटवरील भार कमी होणार असून, यामुळे रेल्वे तिकीट बुकिंगसाठी लांबच्या लांब रांगा सुद्धा लागणार नाहीत.

दरम्यान, पेटीएमच्या या फीचरमध्ये सीट बुकिंग पासून ते ट्रेनमधील विविध पर्याय दिले गेले आहेत. यामुळेवापरकर्ते आपल्या पसंतींच्या आधारे ट्रेनचे तिकीट बुक करू शकतात. पेटीएमच्या मते, हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना पर्यायी स्थानकांसह अनेक पर्यायी ट्रेनचा पर्याय दर्शवेल. जवळच्या स्टेशनवरून कन्फर्म सीटचे तिकीट उपलब्ध असेल तर तेही सुचवते. यामुळे आपली सीट कन्फर्म होण्याची शक्यता अजून वाढते.

ट्रेनचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी सर्वात आधी पेटीएम अॅप उघडा. यानंतर तुमच्या डेस्टिनेशनची ट्रेन शोधा. ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही वेटलिस्ट निवडल्यास, तुम्हाला काही पर्यायी स्थानके दिसतील. दरम्यान, आता यूजर्स आपल्या जवळच्या स्टेशनवरून तिकीट बुक करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe