OnePlus 12 5G बद्दल विचार करत असाल आणि चांगल्या ऑफरच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. OnePlus ब्रँडचा हा दमदार स्मार्टफोन आता Amazon वर सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही Apple वापरकर्ता असाल आणि नवीन Android स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
आकर्षक ऑफर आणि सवलती
Amazon वर OnePlus 12 5G चा 12GB RAM व्हेरिएंट सवलतीसह उपलब्ध आहे. या फोनवर विविध ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे तुम्हाला तो खूप परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतो. जर तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, तर आम्ही या डीलबद्दल अधिक माहिती देत आहोत.

OnePlus 12 5G किंमत
OnePlus 12 5G चा 16GB RAM + 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, Amazon वर तुम्हाला 4% सूट मिळत असून हा फोन 66,998 रुपयांना खरेदी करता येईल.
तसेच, HDFC आणि Axis Bank कार्डधारकांना 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय, तुम्हाला 27,350 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जर तुम्हाला हप्त्यांमध्ये पेमेंट करायचे असेल, तर तुम्ही 3,248 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI पर्यायाचा लाभ घेऊ शकता आणि फोन घरी बसून ऑर्डर करू शकता.
OnePlus 12 5G चे फीचर्स
हा स्मार्टफोन प्रीमियम फीचर्ससह येतो. यात 6.82-इंचाचा OLED डिस्प्ले असून तो 4,500 निट्सच्या पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सुसज्ज आहे.परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. अधिक सुरक्षिततेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास,फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.फोनला 5,400mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. त्यामुळे कमी वेळेत जलद चार्जिंगचा अनुभव तुम्हाला मिळू शकतो.
जर तुम्ही हाय-परफॉर्मन्स असलेला, उत्तम डिस्प्ले आणि कॅमेरा असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर OnePlus 12 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः, Amazon वरील या ऑफरमुळे हा फोन अधिक परवडणारा झाला आहे. जर तुम्हाला प्रीमियम अनुभव हवा असेल आणि उत्तम परफॉर्मन्ससह एक दमदार डिव्हाइस घ्यायचे असेल, तर OnePlus 12 5G हा एक योग्य पर्याय ठरेल.