प्रतीक्षा संपली ! OnePlus 15R ‘या’ तारखेला लॉन्च होणार, समोर आली मोठी माहिती

Published on -

Oneplus 15R Launch Date : वन प्लस कंपनीने आपल्या ग्राहकांना नुकतीच एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने अलीकडेच बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत OnePlus 15 भारतात लाँच केला आहे. खरंतर या स्मार्टफोनच्या बरेच दिवस चर्चा सुरू होत्या आणि आता हा स्मार्टफोन लॉन्च झाला असल्याने ग्राहकांची प्रतीक्षा देखील संपली आहे.

खरंतर कंपनी दरवर्षी जानेवारी महिन्यात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करते आणि फ्लॅगशीप स्मार्टफोन लॉन्च करतानाच कंपनीकडून कमी किमतीची R सिरीज सुद्धा लाँच केली जाते. मात्र यावेळी कंपनीने आपली ही परंपरा मोडली आहे.

कंपनीने यावेळी फक्त वनप्लस 15 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला असून R सिरीजचा म्हणजेच 15R हा स्मार्टफोन अद्याप लॉन्च केलेला नाही. विशेष म्हणजे जानेवारी ऐवजी यावेळी कंपनीने नोव्हेंबर महिन्यातच आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन ग्राहकांसाठी लॉन्च केला.

वनप्लस 15 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 प्रोसेसर असलेला भारतातील पहिला फोन आहे. याची किंमत 72,999 रुपयांपासून सुरू होते. पण आता Oneplus 15R नेमका कधी लॉन्च होणार हा सवाल उपस्थित होऊ लागलाय.

दरम्यान या प्रीमियम फ्लॅगशिप फोनच्या लाँचिंगसोबतच कंपनीने आपल्या चाहत्यांना आणखी एक भेट दिली आहे. ब्रँडने अधिकृतपणे OnePlus 15R ची घोषणा केली आहे. OnePlus ने लवकरच त्यांचा नवीन 15R फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.

OnePlus 15R लाँचिंगची घोषणा कंपनीचे उत्पादन धोरण संचालक, मार्सेल कॅम्पोस यांनी स्वतः केली आहे. खरेतर, OnePlus 15 च्या लाँचिंग स्ट्रीम दरम्यान 15R मॉडेल उघड करण्यात आले.

सध्या, OnePlus 15R लाँचिंगची तारीख आणि स्पेसिफिकेशन असं सगळं गुलदस्त्यात आहे. पण, हे स्पष्ट करण्यात आले आहे की कंपनी लवकरच OnePlus 15R लाँच करणार आहे.  

OnePlus 15R चे फिचर्स अन स्पेसिफिकेशन 

अपकमिंग OnePlus 15R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर राहणार असे म्हटले जात आहे. हे OnePlus 15 मध्ये आढळणाऱ्या Snapdragon 8 Elite Gen 5 चे लोअर-एंड व्हर्जन असेल, ज्याची क्लॉक स्पीड 3.8GHz पर्यंत असेल.

हा येणारा OnePlus फोन भारतीय बाजारात 16GB RAM सह लॉन्च होऊ शकतो, ज्याचा बेस व्हेरिएंट 12GB RAM सह येऊ शकतो. OnePlus 15R मध्ये 165Hz रिफ्रेश रेट स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे. तसेच 15R मध्ये BOE LTPO OLED पॅनेल वापरला जाईल.

यात 1.5K रिझोल्यूशनसह फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन 7800 mAh बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. याचा अर्थ 15R मध्ये 15 पेक्षा मोठी बॅटरी राहणार असा अंदाज आहे.

नक्कीच मीडिया रिपोर्ट मध्ये जसे सांगितले जात आहे तसे जर असेल तर हा कंपनीचा सर्वात मोठी बॅटरी असणारा मोबाईल बनणार आहे. हा OnePlus फोन मेटल फ्रेमवर बनवला जाईल आणि IP68 रेटिंगसह लाँच केला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe