Oneplus 15 लाँच होताच कंपनीचा आणखी एक मोठा धमाका ! Oneplus 15R लॉन्चिंगची संभाव्य तारीख पण आली समोर

Published on -

Oneplus 15R Launch : नवा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी वन प्लसच्या चाहत्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. काल, गुरुवारी भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये OnePlus 15 लाँच झालाय.

पण हा स्मार्टफोन लॉन्च करताना OnePlus ने काही ट्रेंड तोडले आहेत. ज्या पद्धतीने टेक दिग्गज कंपनी एप्पल सप्टेंबर महिन्यात आपली नवीन सिरीज लॉन्च करत असते, त्याच धर्तीवर चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oneplus जानेवारीमध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करते.

गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीचा हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळालाय. विशेष म्हणजे कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करताना प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटसाठी R मालिकेतील थोडी स्वस्त आवृत्ती देखील बाजारात लाँच करते.

मात्र यावेळी कंपनीने एक वेगळा ट्रेंड सेट केला आहे. OnePlus ने यावेळी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन जानेवारी ऐवजी नोव्हेंबर मध्येच बाजारात उतरवला आहे. तसेच 13 नोव्हेंबर 2025 रोजी फक्त आपला फ्लॅगशिप लाँच केला आहे.

ह्या लाँच इव्हेंटमध्ये OnePlus 15R ला वगळण्यात आले आहे. यामुळे कंपनी 15R लॉन्च करणार की नाही आणि लॉन्च करणार असेल तर कधी लॉन्च होणार असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित होत होता.

आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे की OnePlus 15R लवकरच लाँच होणार आहे. हा फोन डिसेंबरमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने वनप्लस 15R चे फीचर्स कसे राहणार ? या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.

पण अलीकडेच चायना मध्ये कंपनीने एक नवा स्मार्टफोन लाँच केलाय. Ace 6 हा स्मार्टफोन चायना मध्ये अलीकडेच लॉन्च झाला आहे आणि हाच स्मार्टफोन भारतात रीब्रँडिंग करून 15R म्हणून लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

त्याच्या किमती बाबत बोलायचं झालं तर चायना मध्ये हा फोन 2599 युवानला अर्थात भारतीय रुपयांमध्ये 32 हजार रुपयांना उपलब्ध आहे.

म्हणजेच कंपनीने त्याच्या मागील मॉडेल पेक्षा किमतीत 300 युवानची वाढ केली आहे. दरम्यान भारतात देखील 15R लॉन्च झाला तर त्याची किंमत 45 हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News