OnePlus 32 Inch Smart TV : ऑफर अशी की तुमचेही उडतील होश! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येत आहे OnePlus चा 32 इंच टीव्ही

Updated on -

OnePlus 32 Inch Smart TV : OnePlus ही आघाडीची कंपनी केवळ स्मार्टफोनचं नाही तर स्मार्ट टीव्हीही लाँच करत असते. सध्या बाजारात कंपनीच्या स्मार्ट टीव्हीची खूप क्रेझ आहे. परंतु कंपनीच्या स्मार्ट टीव्हीची किंमत खूप जास्त असते.

परंतु आता तुम्ही कंपनीचा 32 इंच स्मार्ट टीव्ही मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी ऑफर तुम्हाला कंपनीच देत असून त्यामुळे आता तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 11500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

पहा डिस्काउंट आणि ऑफर्स

जर या टीव्हीच्या किमतीचा विचार केला तर 4K रिझोल्यूशनसह OnePlus Y-Series स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत रु 18,999 आहे. परंतु आता कंपनी 6000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटवर विक्री करत आहे. तसेच, तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे 1500 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ दिला जात आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचे फुल एचडी रिझोल्यूशन असणारे हे 32-इंच टीव्ही या श्रेणीमध्ये उपलब्ध आहेत, मात्र 4K मॉडेल्सवर अशी सूट नेहमीच उपलब्ध नसते.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

OnePlus चा 32-इंच स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही HD रेडी (1366×768) रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो. यामध्ये दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट तसेच अंगभूत वायफाय-ब्लूटूथ सपोर्ट दिला जात आहे. तसेच शक्तिशाली ऑडिओसाठी, यामध्ये 20W एकूण आउटपुट आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट असणारे स्पीकर देण्यात येत आहेत.

Android TV 9.0 सॉफ्टवेअर असणाऱ्या या टीव्हीमध्ये OnePlus Connect, Google Assistant, Chromecast, Shared Album आणि OxygenPlay सारखी भन्नाट फीचर्स देण्यात येत आहेत. इतकेच नाही तर हा टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओसारख्या OTT प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News