OnePlus 5G Smartphone : पैसे वसूल ऑफर! प्रथमच OnePlus चा ‘हा’ 5G फोन खरेदी करता येतोय खूप स्वस्तात, जाणून घ्या ऑफर आणि किंमत

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus 5G Smartphone

OnePlus 5G Smartphone : वनप्लसचे सर्वच स्मार्टफोन तरुणाईंना चांगलेच वेड लावत आहे. मागणी जास्त असल्याने कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. परंतु या फोनच्या किमती इतर फोनपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेकजण फोन घेणे टाळतात.

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही कमी किमतीत चांगला 5G फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर OnePlus 9 5G खूप स्वस्तात खरेदी करता येईल. ज्यावर तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

जाणून घ्या OnePlus 9 5G वर ऑफर आणि सवलत

काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या OnePlus 9 5G ची मूळ 54,999 रुपये इतकी आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हा फोन 42,999 रुपयांना विकला जात आहे. इतकेच नाही तर तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. त्याशिवाय जे OnePlus 9 5G खरेदी करतील त्यांना 6 महिन्यांसाठी मोफत Spotify वापरता येणार आहे.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, 6.55-इंच फुल-एचडी, अल्ट्रा-एचडी (4K) रिझोल्यूशन दिले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टममध्ये EIS सह 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 2MP मोनोक्रोम कॅमेरा देण्यात येत आहे. तसेच सेल्फी प्रेमींचा विचार करता यात EIS सह 16 एमपी लेन्स दिली आहे. हा फोन 65W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe