Oneplus New Smartphone Update : तुम्हालाही नवा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? मग तुमच्यासाठी आज आम्ही एक खास बातमी घेऊन आलो आहोत. खरे तर वनप्लसने आपल्या ग्राहकांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच आपला एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
OnePlus 15 लवकरच भारतीय ग्राहकांसाठी लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने नुकताच या नव्या स्मार्टफोनचा डिझाईन टीझर सादर केला आहे. यामुळे हा फोन लवकरच ग्राहकांच्या भेटीसाठी येणार असल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आधी हा स्मार्टफोन चीनमध्ये दाखवण्यात आला होता.

पण आता भारतातही याच्या Sand Storm कलर व्हेरिएंटचा टीझर जारी झाला आहे. त्यामुळे हा फोन भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे जर तुम्हालाही वन प्लसचा नवा फोन घ्यायचा असेल तर आत्तापासूनच तुम्हाला तुमचे बजेट तयार करून ठेवावे लागणार आहे.
चीनमध्ये याची लॉन्चिंग पुढील महिन्यात होणार असल्याची बातमी समोर येत आहे. पहिले चायना मध्ये लॉन्च होईल आणि त्यानंतर मग हा स्मार्टफोन आपल्या भारतातही लॉन्च करण्यात येणार आहे. या नव्या स्मार्टफोनचे डिझाईन हे पूर्णतः हटके राहणार आहे.
Dune Aesthetics संकल्पनेवर याचे डिझाईन राहील. त्यात अल्ट्रा-मिनिमलिस्ट डिझाईन, लहानसा कॅमेरा मॉड्यूल आणि प्रीमियम टेक्स्चर देण्यात आले आहे. या सर्व गोष्टी फोनच्या टीचर वरून दिसत आहेत.
फोनमध्ये 1.15mm अल्ट्रा-नॅरो बेजल्स, गोल्डन कोर्नर्स, एयरोस्पेस-ग्रेड नॅनो सिरेमिक मेटल व आइस स्किन फील असे काही फीचर सुद्धा कंपनीकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तसेच फोनवर मिलिट्री-ग्रेड मायक्रो-आर्क ऑक्सिडेशन, आयन कलरिंग तसेच नॅनो-लेव्हल सीलिंगसारख्या अॅडव्हान्स्ड प्रोसेसचा वापर करण्यात आला असल्याची माहिती रिपोर्ट मधून समोर आली आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरसह बाजारात लॉन्च केला जाणार आहे.
तसेच 165Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, Windspeed Gaming Core आणि Android 16 OS यासह 16GB पर्यंत RAMचा पर्याय यामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तब्बल 7,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे.
म्हणजे बॅटरीच्या बाबतीत हा कंपनीचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन म्हणून ओळखला जाईल. स्मार्टफोनचा कॅमेरा सुद्धा चांगला राहणार आहे. तसेच हा मोबाईल वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएंटसह लॉन्च होईल. हा एक गेमिंग स्मार्टफोन असेल. या फोनची स्पर्धा इतर दिग्गज कंपन्यांच्या फ्लॅगशीप मॉडेल सोबत राहणार आहे.