OnePlus Nord CE 3 5G : मागील महिन्यात वनप्लसने आपला OnePlus Nord CE 3 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता. ज्याच्या विक्रीला लवकरच सुरुवात होणार झाली आहे. तुम्हाला तो आता मोठ्या सवलतीसह खरेदी करता येईल.
नवीन OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोनची विक्री 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये लाँच केला आहे एक म्हणजे 8 GB 128 GB आणि दुसरा म्हणजे 8 GB 256 GB. याच्या 128 जीबी वेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे.

तुम्हाला त्याच्या 256 GB वेरिएंटसाठी 28,999 रुपये मोजावे लागणार आहेत. बँक ऑफरमध्ये तुम्हाला या फोनवर 2 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते. तुम्हाला हा स्मार्टफोन एक्वा सर्ज आणि ग्रे शिमर कलर पर्यायांत खरेदी करता येईल. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 80 वॉट फास्ट चार्जिंगसह अनेक अप्रतिम फीचर्स दिले आहेत.
जाणून घ्या Nord CE 3 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 2412×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. हा फुल एचडी डिस्प्ले 20.1:9 च्या गुणोत्तर आणि 120Hz च्या रिफ्रेश दरासह येतो. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा स्मार्टफोन 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज असेल. शिवाय प्रोसेसर म्हणून कंपनी या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 782G चिपसेट देत असून फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत.
Nord CE 3 मध्ये 50-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी या नवीनतम फोनमध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh ची आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणारा हा फोन Android 13 वर आधारित OxygenOS 13.1 वर काम करेल.