OnePlus Nord CE 3 Lite : अप्रतिम ऑफर.. 108MP कॅमेरा असणाऱ्या वनप्लसच्या ‘या’ लोकप्रिय फोनच्या खरेदीवर मिळत आहे बरेच फायदे; जाणुन वाटेल आश्चर्य

OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus Nord CE 3 Lite : काही दिवसांपूर्वी वनप्लस या लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला नवीन Nord CE 3 Lite हा फोन लाँच केला होता. लाँच झाल्यानंतर या फोनने मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तसेच ओप्पो, सॅमसंग यांसारख्या आघडीच्या कंपन्यांनाही टक्कर दिली आहे.

या फोनची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. ज्याच्या खरेदीवर तुम्हाला आता YouTube Premium चे सबस्क्रिप्शन दोन महिन्यांसाठी आणि Spotify Premium चे सबस्क्रिप्शन 6 महिन्यांसाठी मोफत देण्यात येत आहे. तसेच या ऑफरमध्ये तुम्हाला अनेक फायदेही मिळणार आहेत.

सध्या ग्राहकांना OnePlus द्वारे सामुदायिक विक्रीचा लाभ देण्यात येत आहे, जो 11 जूनपर्यंत चालेल. या सेलदरम्यान तुम्हाला कंपनीच्या अनेक उपकरणांवर सवलत मिळेल. तसेच तुम्हाला विशेष ऑफरचा लाभ घेता येईल. सध्या कंपनीच्या OnePlus Nord CE 3 Lite वर फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध नसून बँक ऑफरसह किंवा एक्सचेंज डिस्काउंटमुळे स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

जाणून घ्या ऑफर

किमतीचा विचार केला तर कंपनीच्या या बजेट फोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे ज्यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येत आहे. समजा तुम्ही हा फोन Amazon वरून हे विकत घेतला तर तुम्हाला HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिट कार्ड पेमेंटवर 5% अतिरिक्त सवलत मिळेल. तसेच जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीनुसार, 17,000 रुपयांपर्यंत जास्तीत जास्त एक्सचेंज डिस्काउंटसह जुन्या फोनसाठी डिव्हाइस एक्सचेंज करता येईल.

इतकेच नाही तर JioPlus चा Rs 399 पोस्टपेड प्लॅन आणि 3,500 रुपयांचे फायदे सेल दरम्यान या फोनच्या खरेदीवर देण्यात येत आहेत. तसेच तुमच्यासाठी मोफत YouTube Premium चे सबस्क्रिप्शन दोन महिन्यांसाठी आणि Spotify Premium चे सबस्क्रिप्शन 6 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्ही हा फोन 6 महिन्यांसाठी विनाशुल्क EMI वर खरेदी करू शकता.

फीचर्स

OnePlus Nord सीरिजमधील नवीन फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा LCD फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळेल. जर स्टोरेजचा विचार केला तर 8GB LPDDR4X रॅम शिवाय, या फोनमध्ये 256GB पर्यंत UFS2.2 स्टोरेज दिले आहे.

या फोनच्या मागील पॅनलमध्ये 2MP डेप्थ सेन्सर तसेच 108MP मुख्य सेन्सरसह 2MP मॅक्रो लेन्स दिल्या आहेत. 16MP फ्रंट कॅमेरा असणाऱ्या या फोनला 67W SuperVOOC चार्जिंगसह 5000mAh बॅटरी मिळेल. यामध्ये Android 13 वर आधारित OxygenOS 13 उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe