OnePlus ने फोल्डेबल स्मार्टफोनच्या जगात आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने OnePlus Open 2 ची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन येत्या काही महिन्यांत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि उच्च-कार्यक्षमतेच्या वैशिष्ट्यांसह हा स्मार्टफोन फोल्डेबल फोनच्या बाजारपेठेत नवीन मापदंड निर्माण करण्यास सक्षम ठरेल.
डिझाइन आणि डिस्प्ले
OnePlus Open 2 मध्ये 8.0-इंचाचा LTPO3 फ्लेक्सी-फ्लुइड AMOLED मुख्य डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो. यामुळे फोल्ड डिस्प्ले अधिक स्मूथ आणि ब्राइट दिसतो, जो मल्टीटास्किंग आणि व्हिज्युअल अनुभवासाठी उत्तम ठरेल. बाहेरील डिस्प्ले 6.4-इंचाचा LTPO3 सुपर फ्लुइड OLED आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि सिरॅमिक गार्ड संरक्षणासह सादर केला गेला आहे. डिव्हाइसचा फ्रेम अधिक पातळ आणि हलका ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे हाताळायला अधिक सोयीस्कर आणि प्रीमियम लुक देणारा आहे.

कॅमेरा सेटअप
OnePlus ने हॅसलब्लॅडच्या भागीदारीत विकसित केलेला ट्रिपल 50MP रीअर कॅमेरा सेटअप दिला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये वाइड, टेलिफोटो (3x ऑप्टिकल झूम) आणि अल्ट्रा-वाइड लेन्स समाविष्ट आहेत.यामध्ये PDAF (Phase Detection Autofocus), OIS (Optical Image Stabilization) आणि LED फ्लॅश यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी हा स्मार्टफोन 4K@60fps पर्यंत सपोर्ट करतो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी मुख्य डिस्प्लेवर 20MP फ्रंट कॅमेरा आणि कव्हर डिस्प्लेवर 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे सेल्फी प्रेमी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन उत्कृष्ट पर्याय ठरेल.
बॅटरी
हा स्मार्टफोन 5,900mAh सिलिकॉन-कार्बन लिथियम-आयन बॅटरीसह येतो. यामुळे दीर्घकाळ टिकणारा बॅटरी बॅकअप मिळतो.चार्जिंगच्या बाबतीतही OnePlus ने मोठा सुधारणा केला आहे. हा स्मार्टफोन 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. त्यामुळे अल्पावधीत हा फोन पूर्ण चार्ज करता येतो.
नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी
हा स्मार्टफोन GSM, HSPA, LTE आणि 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. यामध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6e/7, Bluetooth 5.4, NFC, आणि USB Type-C 3.1 यांसारखे नवीनतम कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत.सुरक्षिततेसाठी यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सीलरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि कंपास यांसारखे अत्याधुनिक सेन्सर आहेत, जे फोनचा वापर अधिक सुरक्षित आणि सुकर बनवतात.
महत्वाचे फीचर्स
हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालतो. यात Qualcomm चा SM8750-AB Snapdragon 8 Elite (3nm) प्रोसेसर देण्यात आला आहे, जो जबरदस्त वेगवान आणि कार्यक्षम आहे.OnePlus Open 2 मध्ये 16GB RAM आणि 512GB किंवा 1TB UFS 4.0 स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे स्टोरेजची कोणतीही अडचण जाणवत नाही आणि फोनचा वेगही अप्रतिम राहतो. हा स्मार्टफोन IPX8 वॉटर-रेसिस्टंट आहे, म्हणजेच तो 1.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धूळ यापासून संरक्षण मिळालेला आहे.
OnePlus Open 2 हा 2025 च्या सर्वात इनोव्हेटिव्ह आणि प्रगत फोल्डेबल स्मार्टफोनपैकी एक ठरणार आहे. यामध्ये शक्तिशाली हार्डवेअर, प्रगत सॉफ्टवेअर आणि अतिशय आकर्षक डिझाइन आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन सर्व फोल्डेबल स्मार्टफोनप्रेमींसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.