OnePlus चा फोन थेट 19,000 रुपयांनी स्वस्त, Amazon वर मिळतेय भक्कम सवलत

OnePlus चे टॉप स्मार्टफोन्स सध्या Amazon वर मोठ्या सूटमध्ये उपलब्ध झाले आहेत. ग्राहकांना लाँच किमतीपेक्षा 19,000 रुपयांपर्यंतची बचत करून स्मार्टफोन खरेदी करण्याची ही मोठी संधी असणार आहे.

Published on -

OnePlus Flagship Phone | OnePlus ब्रँड भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. प्रीमियम लूक, शक्तिशाली परफॉर्मन्स आणि उत्तम कॅमेरा फिचर्समुळे हे फोन नेहमीच चर्चेत राहतात. पण आता OnePlus चे काही महागडे स्मार्टफोन्स मोठ्या सूटमध्ये उपलब्ध झाले आहेत. सध्या Amazon वर OnePlus चे टॉप मॉडेल्स त्यांच्या लाँच प्राइसपेक्षा हजारोंनी स्वस्तात विकले जात आहेत. यामध्ये सर्वाधिक सवलत मिळणारा फोन तब्बल 19,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

OnePlus 12 (12GB + 256GB

या प्रीमियम फ्लॅगशिप फोनची लाँच किंमत होती ₹64,999. पण सध्या Amazon वर तो ₹51,998 मध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरनंतर फोनची प्रभावी किंमत होते ₹45,998 – म्हणजेच थेट ₹19,000 ची बचत! Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 2K AMOLED डिस्प्ले, आणि Hasselblad कॅमेरा या फोनला परफॉर्मन्सचा बाप बनवतात.

OnePlus Nord 4 5G (8GB + 256GB)

हा मिड-रेंज सेगमेंटमधील जबरदस्त फोन सध्या ₹29,498 ला विकला जात आहे. बँक ऑफरनंतर केवळ ₹24,998 मध्ये उपलब्ध होतो. लाँच किंमत ₹32,999 असल्याने येथेही ₹8,000 ची बचत आहे. AMOLED डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि 5G सपोर्ट हा या फोनचा यूएसपी आहे.

OnePlus Nord CE 4 5G (8GB + 128GB)

सर्वात स्वस्त पर्याय असलेला हा फोन ₹21,998 मध्ये लिस्ट झाला असून, बँक ऑफरसह फक्त ₹19,998 मध्ये मिळू शकतो. लाँच किंमत होती ₹24,999. म्हणजेच ₹5,000 ची थेट सूट दिली जात आहे. हलकं वजन, सुंदर डिझाईन आणि Snapdragon 7 Gen 3 चा परफॉर्मन्स या फोनला योग्य बनवतो.

जर तुम्हाला नवीन OnePlus फोन घ्यायचा असेल आणि बजेटदेखील महत्वाचं असेल, तर ही सवलत तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. पण ऑफर्स कालावधीस मर्यादित असल्याने निर्णय लवकर घ्या!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News