OnePlus Smartphone : OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये मोठी समस्या, कंपनी परत देतेय पैसे, तुमच्याकडे तर नाही ना हा स्मार्टफोन…

Tejas B Shelar
Published:
OnePlus Smartphone

OnePlus Smartphone : OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनके नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत. OnePlus च्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. OnePlus कडून त्यांच्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत.

मात्र OnePlus च्या एका नवीन स्मार्टफोन ग्राहकांना मोठ्या समस्या येत असल्याचे समोर आले आहे. OnePlus च्या स्मार्टफोनची लोकप्रियता पाहता आणि ती टिकवण्यासाठी कंपनीकडून त्यांचे स्मार्टफोन पुन्हा मागवण्यात आले आहेत.

OnePlus स्मार्टफोन कंपनीकडून अलीकडेच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मात्र या स्मार्टफोनमध्ये समस्या आढळली आहे. कंपनीकडून देखील समस्या मान्य करण्यात आली असून ग्राहकांना पैसे पुन्हा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

OnePlus 12R या नवीन स्मार्टफोन ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत. हा स्मार्टफोन दोन स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. OnePlus 12R च्या 256GB स्टोरेजसह येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ही समस्या येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कंपनीकडून 256GB स्टोरेज असलेला OnePlus 12R खरेदी केलेल्या ग्राहकांना पैसे पुन्हा दिले जाणार आहेत. OnePlus 12R ची 256GB आवृत्ती UFS 4.0 स्टोरेजसह सादर करण्यात आली आहे. OnePlus 12R ची 256GB स्मार्टफने वापरकर्त्यांना फोनचे स्पीड कमी मिळत असल्याची तक्रार मिळत आहे.

मार्चच्या मध्यापर्यंत ग्राहकांना OnePlus कडून पैसे परत दिले जाणार

OnePlus स्मार्टफोन कंपनीकडून त्यांच्या OnePlus 12R व्हेरियंटमध्ये समस्या येत असल्याचे मान्य केले आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, UFS 3.1 स्टोरेज चुकून इन्स्टॉल झाले आहे. कंपनीकडून ग्राहकांना मार्चच्या मध्यापर्यंत ग्राहकांना पैसे परत दिले जाणार आहेत.

OnePlus 12R मध्ये काय समस्या आहे?

OnePlus कडून अलीकडेच 12 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये OnePlus 12 आणि OnePlus 12R चा समावेश आहे. OnePlus 12R मध्ये नवीन सॉफ्टवेअर अल्गोरिदम वापरण्यात आले आहे.

हे सॉफ्टवेअर स्मार्टफोन जलद गतीने काम करण्यास मदत करते. मात्र कंपनीकडून चुकून UFS 3.1 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन वापरताना अनेक समस्या येत आहेत.

तुम्हीही हा स्मार्टफोन खरेदी केला असेल तर तुम्हाला 16 मार्चपर्यंत तो परत करावा लागणार आहे. तेव्हा या स्मार्टफोन वापरकर्त्यांना कंपनीकडून रिफंड दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe