OnePlus Smartphone Offer : 100W चार्जिंग असणारे OnePlus चे हे दोन 5G फोन 15 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus Smartphone Offer

OnePlus Smartphone Offer : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला OnePlus चे 5G स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही Amazon वर मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊन तुमचे स्मार्टफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

परंतु तुम्हाला Amazon वर सुरु असणाऱ्या या सवलतीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ही सेल काही दिवसांसाठीच असणार आहे. Amazon वर सुरु असणाऱ्या सेलमधून तुम्हाला OnePlus 11R 5G आणि OnePlus 11 5G हे स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येतील.

जाणून घ्या OnePlus 11R 5G वर मिळणारी संपूर्ण ऑफर

किमतीचा विचार केला तर OnePlus 11R 5G या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. तसेच या सेलमध्ये फोनवर 37,950 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. तर तुम्हाला बँक ऑफरमध्ये फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी करता येईल. या फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिला आहे.

जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी तुम्हाला यात 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो. हा फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटवर काम करेल. तर त्याची बॅटरी 5000mAh आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

जाणून घ्या OnePlus 11 5G ऑफर

स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर OnePlus चा हा शानदार स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. OnePlus 11 5G फोनची किंमत 56,999 रुपये इतकी आहे. तर हा स्मार्टफोन सेलमध्ये 42,600 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह खरेदी करता येईल. तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर हा फोन 56,999 – 42,600 रुपयांना म्हणजेच 14,399 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल.

ही ऑफर घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की या फोनवर मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर आणि त्याच्या ब्रँडवर अवलंबून असणार आहे. तर तुम्हाला बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत 2,000 रुपयांनी कमी करता येईल. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED QHD डिस्प्ले मिळेल.

जो गोरिला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह येतो. तसेच फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्ससह 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर दिला आहे. तर यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तुम्हाला खरेदी करता येईल. यात 5000mAh बॅटरी मिळेल, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe