OnePlus Upcoming Smartphone : Vivo, Oppo ची बोलती बंद ! OnePlus उद्या लॉन्च करणार दमदार स्मार्टफोन, असणार इतकी किंमत

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus Upcoming Smartphone

OnePlus Upcoming Smartphone : OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक शानदार स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. OnePlus च्या स्मार्टफोनला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता OnePlus कडून त्यांचे आणखी नवीन स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. OnePlus ने त्यांची नवीनतम फ्लॅगशिप सादर केली आहे. यामध्ये OnePlus 12 आणि OnePlus 12R चा समावेश आहे. 28 जानेवारी रोजी म्हणजेच उद्याच जागतिक स्तरावर हे स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत.

OnePlus च्या नवीन स्मार्टफोनची किंमत

स्टँडर्ड OnePlus 12R च्या 8GB RAM / 128GB स्टोरेज व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 39,999 रुपये आहे तर 16GB RAM / 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये ठेवण्यात आली आहे. OnePlus च्या नवीन स्मार्टफोनची विक्री 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

OnePlus 12R स्मार्टफोनमध्ये LTPO4.0 च्या समर्थनासह 6.78-इंचाचा AMOLED ProXDR डिस्प्ले देण्यात आला आहे जे 120Hz च्या रिफ्रेशसह सादर करण्यात आला आहे.

OnePlus 12R स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह सुसज्ज असेल. ग्राफिक्ससाठी Adreno 740 GPU सह जोडण्यात आला आहे. OnePlus 12R 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.

OnePlus च्या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये OIS आणि EIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल Sony IMX890 प्राथमिक सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 12R स्मार्टफोनमध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे. OnePlus 12R या नवीन स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी पॅक दिला आहे. हा बॅटरी पॅक 100W SUPERVOOC चार्जरसह देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe