OnePlus Watch 3 च्या जागतिक लाँचची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हे स्मार्टवॉच 18 फेब्रुवारी 2024 रोजी बाजारात दाखल होणार असून हे OnePlus Watch 2 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे.नवीन वनप्लस वॉच कॅनडा,अमेरिका आणि युरोपसह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल.यामध्ये डिझाइन, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
डिझाईन
OnePlus Watch 3 मध्ये स्टेनलेस स्टील बॉडी आणि टायटॅनियम बेझल असणार आहे, ज्यामुळे हे घड्याळ स्टायलिश आणि टिकाऊ असेल.यामध्ये नेव्हिगेशनसाठी फिरणारे क्राउन बटण देण्यात आले आहे, जे युजर्ससाठी अधिक सोयीस्कर असेल. त्याच बरोबर, यात 2D सफायर क्रिस्टल डिस्प्ले देण्यात आला असून,हा डिस्प्ले स्क्रॅच-प्रतिरोधक आणि अत्यंत स्पष्ट असेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळेल.
परफॉर्मन्स
OnePlus Watch 3 मध्ये Snapdragon W5 चिपसेट वापरण्यात आला आहे.यासोबत BES2800 MCU चिप देखील देण्यात आली आहे,जी उच्च कार्यप्रदर्शन आणि उत्तम ऊर्जा व्यवस्थापन सुनिश्चित करेल.हे स्मार्टवॉच 2GB RAM आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज सह येईल, त्यामुळे युजर्सना अधिक वेगवान आणि स्मूथ अनुभव मिळेल.
बॅटरी
बॅटरी बॅकअपच्या बाबतीत, OnePlus Watch 3 एक मोठा दावा करतो. यात 631mAh ची दमदार बॅटरी आहे. पॉवर सेव्हिंग मोडमध्ये हे 16 दिवसांपर्यंत बॅकअप देऊ शकते, तर स्मार्ट मोडमध्ये 5 दिवस चालू शकते.जास्तीत जास्त वापरासाठी देखील 72 तासांचा बॅकअप मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. हे स्मार्टवॉच WearOS वर चालेल, त्यामुळे युजर्सला Google Play Store मधून विविध अॅप्स आणि नवीन फिचर्सचा सहज वापर करता येईल.
हेल्थ फीचर्स
आरोग्यविषयक वैशिष्ट्यांमध्ये, OnePlus Watch 3 मध्ये ECG (Electrocardiogram) मॉनिटरिंग सारखी महत्त्वाची सुविधा देण्यात आली आहे, जी हृदयाच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवण्यास मदत करेल. त्याचबरोबर, हे स्मार्टवॉच एमराल्ड टायटॅनियम आणि ऑब्सिडियन टायटॅनियम या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल,जे प्रीमियम लुक देतात.
सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेता, OnePlus Watch 3 हे प्रभावी बॅटरी लाइफ, उत्कृष्ट डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या फीचर्स असलेले एक परिपूर्ण स्मार्टवॉच ठरण्याची शक्यता आहे. मात्र, याची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही, वनप्लस चाहत्यांसाठी हे वॉच एक उत्तम पर्याय ठरू शकते.