iPhone 15 : जर तुम्हाला नवीन आयफोन घ्यायचा असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर, तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना लेटेस्ट आयफोन मॉडेल्स iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर जबरदस्त डीलचा लाभ मिळत आहे. ही डील फक्त दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे.
सध्या तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून iPhone 15 आणि iPhone 15 Plus मॉडेल्स थेट 3500 हजार रुपयांच्या सूटसह खरेदी करण्याची संधी मिळत आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे दोन्ही मॉडेल्स या प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काउंटवर सूचीबद्ध आहेत. अतिरिक्त सवलतीचा लाभ 25 एप्रिलपर्यंतच मिळणार आहे. बॉब कार्ड ग्राहकांना सुलभ ईएमआय पर्याय देखील देत आहे.
Apple ने भारतीय बाजारात लेटेस्ट लाइनअपचे बेस मॉडेल 79,900 रुपये किमतीत लॉन्च केले होते. त्याच वेळी, डिस्काउंटनंतर, हा डिव्हाइस फ्लिपकार्टवर 65,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. BOB कार्डवर सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत केवळ 62,499 रुपये होईल. 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची ही किंमत आहे.
128GB स्टोरेजसह iPhone 15 Plus मॉडेलचा बेस व्हेरिएंट भारतात 89,900 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला. हा फोन फ्लिपकार्टवर मोठ्या फ्लॅट डिस्काउंटनंतर 75,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. जर आपण BOB कार्डसह उपलब्ध ऑफरबद्दल बोललो तर, 3500 रुपयांच्या सवलतीमुळे त्याची किंमत केवळ 72,499 रुपयांपर्यंत खाली येते. अशास्थितीत तुम्ही दोन्ही मॉडेल्सवर मोठी सूट मिळवू शकता. आणि कमी किंमतीत हा फोन खरेदी करू शकता.