OPPO A17K : आकर्षक ऑफर! 7GB RAM आणि 5000mAh बॅटरी असणारा ‘हा’ स्मार्टफोन 9 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
OPPO A17K

OPPO A17K : तुम्ही आता कमी किमतीत ओप्पोचा 5000mAh जबरदस्त बॅटरी असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की तुम्हाला या संधीचा लवकरत लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. कारण ऑफर काही दिवसांसाठीच असणार आहे.

आता तुम्ही OPPO A17K फोन Amazon वरून सहज खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 7GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज दिले जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी पाहायला मिळेल.

जाणून घ्या ऑफर

Amazon वर आता ओप्पोच्या OPPO A17K वर 27% ची बंपर सवलत देण्यात येत आहे. या शानदार ऑफरनंतर या स्मार्टफोनची किंमत केवळ 9,499 रुपये इतकी असणार आहे. इतकेच नाही तर या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ज्याचा फायदा घेऊन तुम्हाला या फोनची किंमत आणखी कमी करता येईल. समजा तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 1000 रुपयांची झटपट सवलत देखील मिळेल. त्याशिवाय सिटी बँक क्रेडिट कार्डवर एक हजाराची सवलत देण्यात येत आहे.

एक्सचेंज ऑफर

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी एक मोठी ऑफर देण्यात येत आहे. तसेच तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. समजा तुमच्याकडे जुना फोन असल्यास तर तुम्ही या ऑफर अंतर्गत फोनची किंमत आणखी 9,000 रुपयांनी कमी करता येईल.

परंतु तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर एक्सचेंज ऑफर मिळेल. जर तुमच्या फोनची स्थिती चांगली असल्यास तुम्हाला 9,000 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल.

जाणून घ्या खासियत

या स्मार्टफोनमध्ये HD रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा IPS LCD, 60Hz रिफ्रेश रेट आणि 600nits पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. हे Android 12 वर आधारित ColorOS 12.1 सह काम करते. याच्या प्रोसेसरबद्दल सांगायचे झाले तर, OPPO A17k मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे.

यात 4GB व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञानासह 3GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल. याचे अंतर्गत स्टोरेज 1TB पर्यंत वाढू शकते. तसेच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 8MP चा सिंगल कॅमेरा सेटअप दिला आहे. याच्या समोर 5MP सेल्फी कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe