Oppo A17k : ओप्पो ही स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांच्या मजबूत फोनसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Oppo A17k हा स्मार्टफोन लाँच केला होता. जर तुम्ही मजबूत फीचर्स, दमदार बॅटरी आणि कमी किमतीत फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
कारण तुम्हाला Amazon वर एक भन्नाट ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही 12,999 रुपयांचा फोन 9 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. यात तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर ऑफर.
जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनीच्या या फोनमध्ये तुम्हाला 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असून त्याची ब्राइटनेस पातळी 600 nits आहे. हा फोन 3GB रिअल आणि 4GB व्हर्च्युअल रॅमसह येतो. त्यामुळे त्याची एकूण RAM 7 GB RAM पर्यंत आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनीकडून या फोनमध्ये MediaTek Helio G35 चिपसेट देण्यात येत आहे.
या फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा सिंगल लेन्स दिली असून तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन IPX4 रेटिंगसह येतो. तर OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन आउट ऑफ द बॉक्स Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळणार आहेत.