Oppo A38 : बाजारात ओप्पोच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी आता 5G स्मार्टफोन लाँच करू लागली आहे. ज्यांच्या किमती काहीशा जास्त आहेत.
कंपनीने आपला Oppo A38 हा फोन बाजारात आणला आहे. जो आता तुम्ही तुमच्याच बजेटमध्ये सहज खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. शिवाय तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन देखील खरेदी करता येईल. Oppo A38 मध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा आणि 5000mah बॅटरी मिळेल.
जाणून घ्या Oppo A38 ची खासियत
कंपनीकडून Oppo A38 च्या शानदार फोनमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. तसेच नवीन Oppo A38 हा MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे देखील समर्थित आहे. हा फोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो. इतकेच नाही तर या स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
कॅमेरा आणि 5000mA बॅटरी
कंपनीने आपल्या ग्राहकांना फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स दिलेली आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, 5-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी पाहायला मिळेल.
जी 33W SuperVOOC चार्जरसह जलद चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कंपनीने कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल सिम सपोर्ट, ब्लूटूथ 5.0, 4G VoLTE, Wi-Fi, GPS, USB-C पोर्ट आणि हेडफोनसाठी 3.5mm ऑडिओ जॅक उपलब्ध करून दिला आहे. तर फोनमध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आलेला आहे.
जाणून घ्या किंमत
सध्या हा स्मार्टफोन मलेशियामध्ये उपलब्ध आहे. Oppo A38 या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. किमतीचा विचार केला तर फोनची किंमत RMB 599 (अंदाजे रु. 10,600) आहे.