Oppo A57 : 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि जबरदस्त प्रोसेसरसह ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येत आहे Oppo A57, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Oppo A57

Oppo A57 : तुम्ही आता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला ओप्पोचा Oppo A57 हा स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. परंतु अशी धमाकेदार ऑफर मर्यादित वेळेसाठी उपलब्ध असणार आहे. Amazon वर अशी ऑफर मिळत आहे.

या फोनची मूळ किंमत 16,990 रुपये इतकी आहे परंतु तो तुम्हाला डिस्काउंटनंतर 13,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये अशी संधी मिळत आहे. त्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असावा. जाणून घेऊयात या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56-इंच फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येत असून स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनीकडून या फोनमध्ये MediaTek Helio G35 चिपसेट दिला जात आहे.

तर फोटोग्राफीसाठी तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे मिळत आहेत. यात 13-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश असून सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सल कॅमेरा दिला जात आहे. इतकेच नाही तर कंपनी या फोनमध्ये AI फेस अनलॉक आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देत ​​आहे.

ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले जात आहेत. हा Oppo फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन अशा दोन रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe