Oppo A78 : जर तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही Amazon च्या सेलमधून शानदार फीचर्स असणारा Oppo A78 हा स्मार्टफोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.
कंपनीच्या या फोनची मूळ किंमत 21,999 रुपये इतकी आहे. परंतु यावर 14% डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 18,999 रुपयांना सहज खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला यावर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा तुम्हाला लाभ घेऊन 18,049 रुपयांपर्यंतचा फायदा होईल.
एक्सचेंज ऑफरसाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असावा. तसेच हे लक्षात घ्या की Oppo A78 वर मिळणारी सवलत काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा. जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
जाणून घ्या Oppo A78 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीकडून Oppo A78 या फोनमध्ये 1612×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश दर आणि 660 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह तुम्हाला खरेदी करता येईल. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 8 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB UFS2.2 स्टोरेज पर्यायात येतो. यामध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek 6833 चिपसेट दिला आहे, जो Mali-G57 MC2 सह काम करतो आणि फोटोग्राफीसाठी कंपनीच्या या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे दिले आहेत.
या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी तुम्हाला फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. तर Oppo चा हा फोन 5000mAh बॅटरी सह तुम्हाला सहज खरेदी करता येईल.
या फोनमध्ये दिलेली ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा स्मार्ट फोन ColorOS वर काम करतो. तसेच वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटीसाठी, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.3 आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसह सर्व मानक पर्याय मिळतील.