OPPO आणि OnePlus घेऊन येणार 8,000mAh बॅटरीचे स्मार्टफोन्स

Karuna Gaikwad
Published:

स्मार्टफोनच्या बॅटरी तंत्रज्ञानात गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती झाली आहे. नवीन इनोव्हेशनमुळे कंपन्यांना डिव्हाइसच्या वजन आणि आकारात फारसा बदल न करता उच्च क्षमतेच्या बॅटरी समाविष्ट करता येत आहे. सध्या बाजारात 6,000mAh ते 7,000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन पाहायला मिळत आहेत. ताज्या अहवालानुसार, OPPO आणि OnePlus आता 8,000mAh बॅटरीची चाचणी करत असल्याचे सांगितले जात आहे.

OPPO आणि OnePlus 8,000mAh बॅटरी

टिपस्टर DCS च्या माहितीनुसार, 8,000mAh बॅटरी टेक्नॉलॉजीची चाचणी सुरू झाली आहे. तथापि, टिपस्टरने कोणत्याही ब्रँडचे नाव थेट नमूद केलेले नाही. मात्र, ‘ओमेगा लॅब्स’ (अनुवादित) नावाचा उल्लेख केला आहे, जो OPPO आणि OnePlus शी संबंधित असल्याचे मानले जाते. हा हाय-कॅपेसिटी बॅटरी पॅक 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल, असे सांगितले जात आहे. तसेच, या बॅटरीमध्ये 15 टक्के हाय-सिलिकॉन मटेरियल असेल, ज्यामुळे कार्यक्षमता आणि आयुष्य वाढण्याची शक्यता आहे.

ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा अशा मोठ्या बॅटरीबद्दल माहिती समोर आली आहे. डिसेंबरमध्ये, OnePlus 7,000mAh बॅटरी टेक्नॉलॉजीवर काम करत असल्याची चर्चा होती. तसेच, Realme देखील 80W फास्ट चार्जिंगसह 8,000mAh बॅटरी विकसित करत असल्याचे सांगितले गेले होते. OnePlus 13 Mini हा एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन असेल आणि त्यामध्ये 6,000mAh बॅटरी असेल, असे अलीकडील लीकमध्ये म्हटले गेले. तसेच, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत लॉन्च होणाऱ्या OnePlus डिव्हाइससाठी 6,000mAh ते 7,000mAh बॅटरी क्षमतेची शक्यता वर्तवली जात आहे.

भविष्यात बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये मोठी सुधार

सध्याच्या स्मार्टफोनमधील बॅटरी क्षमता सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही OnePlus आणि OPPO स्मार्टफोन्सची बॅटरी क्षमता पुढीलप्रमाणे आहे- OnePlus Ace 5 – 6,415mAh (ग्लेशियर बॅटरी टेक) OnePlus 13 (फ्लॅगशिप) – 6,000mAh OPPO Find X8 Pro – 5,910mAh OPPO Reno 13 Pro – 5,800mAh Realme Neo 7 (चीन) – 7,000mAh या सर्व घडामोडी पाहता OPPO आणि OnePlus भविष्यात बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये मोठी सुधारणा करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe