Oppo Find N5 स्मार्टफोनची लॉन्चिंग कन्फर्म! 16GB रॅम, 5600mAh बॅटरीसह फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला धडकणार बाजारात

ओप्पो चाहत्यांसाठी अखेर Oppo Find N5 फोल्डेबल स्मार्टफोनच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून या फोनबद्दल अनेक अफवा आणि लीक्स समोर येत होत्या. पण आता कंपनीने स्वतःच लाँचिंग डेट निश्चित केली आहे. हा फोन 20 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे बाजारात येणार आहे.

Oppo Find N5:- ओप्पो चाहत्यांसाठी अखेर Oppo Find N5 फोल्डेबल स्मार्टफोनच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून या फोनबद्दल अनेक अफवा आणि लीक्स समोर येत होत्या. पण आता कंपनीने स्वतःच लाँचिंग डेट निश्चित केली आहे. हा फोन 20 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे बाजारात येणार आहे.

चीनमध्ये यासाठी आधीच प्री-ऑर्डर सुरू झाली आहे आणि लाँचिंगच्या आधीच या फोनबद्दल मोठी चर्चा आहे. हा फोन तिन्ही शानदार रंगांमध्ये – डस्क पर्पल, जेड व्हाइट आणि सॅटिन ब्लॅक – सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर, Oppo Watch X2 देखील याच दिवशी लाँच होण्याची शक्यता आहे.

असेल नवीन डिझाइन

Oppo Find N5 मध्ये कंपनीने डिझाइनमध्ये मोठे बदल केले आहेत. हा फोन Oppo Find N3 च्या तुलनेत अधिक आकर्षक आणि स्लीक असणार आहे. यात गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिले गेले असून तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश पाहायला मिळतो. फोनच्या मध्यभागी Hasselblad ब्रँडिंग असणार आहे, त्यामुळे कॅमेरा सेगमेंटमध्ये हा फोन अतिशय पॉवरफुल ठरणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आणि अलर्ट स्लायडर देखील असेल. जे याला अधिक प्रीमियम लूक देतात. विशेष म्हणजे हा फोन जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन असेल ज्याची जाडी फक्त 9.2mm (दुमडलेल्या अवस्थेत) असेल. यामुळे हँडलिंग आणि पोर्टेबिलिटीच्या बाबतीत हा फोन इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे.

पावरफुल परफॉर्मन्स आणि दमदार बॅटरी

Oppo Find N5 मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट वापरण्यात आला आहे. जो सध्या बाजारातील सर्वात वेगवान प्रोसेसरपैकी एक आहे. हा फोन 16GB LPDDR5X रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेज पर्यायासह लाँच केला जाणार आहे. त्यामुळे हे डिव्हाइस अतिशय वेगवान आणि मल्टीटास्किंगसाठी योग्य असेल.

कशी असेल बॅटरी?

बॅटरीच्या बाबतीत 5600mAh क्षमतेची मोठी बॅटरी यात असेल जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करेल. त्यामुळे हा फोन अगदी थोड्याच वेळात चार्ज करता येणार आहे.

अत्याधुनिक कॅमेरा सेटअप

Oppo Find N5 चा कॅमेरा विभाग जबरदस्त असणार आहे. 50MP OIS सपोर्ट असलेला मुख्य कॅमेरा यात दिला जाणार आहे. याशिवाय 50MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूमसह 50MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. यामुळे लाँग-डिस्टन्स फोटोग्राफीसाठी हा फोन अतिशय प्रभावी ठरणार आहे.

सॉफ्टवेअर आणि इतर खास फीचर्स

हा स्मार्टफोन Android 15 आधारित ColorOS 15 वर चालणार आहे. यासोबतच कंपनीचा अत्याधुनिक DeepSeek-R1 AI तंत्रज्ञानाचा सपोर्ट यात मिळू शकतो. शिवाय IPX9 रेटिंग असल्यामुळे हा फोन पाण्याच्या थेंबांपासून सुरक्षित राहणार आहे.

Oppo Find N5 का खास आहे?

जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन (9.2mm जाडी)

Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह तगडा परफॉर्मन्स

16GB रॅम आणि 1TB स्टोरेज पर्याय

5600mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग

हॅसलब्लॅड ब्रँडिंग असलेला उत्कृष्ट कॅमेरा सेटअप

Android 15 आधारित ColorOS 15 आणि DeepSeek-R1 AI सपोर्ट

IPX9 रेटिंग – पाण्याच्या थेंबांपासून संरक्षण

Oppo Find N5 हा मार्केटमध्ये जबरदस्त स्पर्धा निर्माण करणार आहे. या फोनच्या फीचर्समुळे तो Samsung Galaxy Z Fold 5 आणि OnePlus Open सारख्या प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देऊ शकतो. जर तुम्ही नवीनतम टेक्नॉलॉजी आणि प्रीमियम लूक असलेला फोल्डेबल फोन शोधत असाल तर Oppo Find N5 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe