OPPO Find N5:- ओप्पोचा आगामी फोल्डेबल फोन OPPO Find N5 चर्चेत असून आता कंपनीने त्याच्या लाँचची अधिकृत टाइमलाइन जाहीर केली आहे. हा फोन फेब्रुवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.विशेषत: 19 ते 21 तारखेदरम्यान चीनमध्ये हा फोन लाँच होईल. पण भारतात लाँच होण्याबाबत सध्या अधिक माहिती मिळालेली नाही.
जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन
OPPO Find N5 होणार आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ फोल्डेबल फोन जो फोल्ड केल्यावर 9.2 मिमी आणि उघडल्यावर 4 मिमी इतका बारीक असेल. हा लाँच झाल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी फ्लिप 6 आणि मोटो रेझरला टक्कर देईल.
OPPO Find N5 चे फीचर्स
स्क्रीन: 8 इंचाचा 2K रिझोल्यूशन डिस्प्ले, जे फोल्डेबल डिव्हाइससाठी एक उत्कृष्ट अनुभव देईल.
चिपसेट: 7-कोर Snapdragon 8 Elite चिपसेट, ज्यामुळे फोन अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली कार्य करेल.
ऑपरेटिंग सिस्टिम: Android 15 आणि ColorOS 15 च्या लेयरसह एक स्मूद आणि युजर-फ्रेंडली अनुभव.
कॅमेरा सेटअप
50 MP OIS प्रायमरी कॅमेरा,50 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा,50 MP (3X) पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा हा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उच्च दर्जाचे फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्षम असेल.
बॅटरी आणि चार्जिंग
5700mAh बॅटरी,80 वॅट वायर्ड आणि 50 वॅट वायरलेस फास्ट चार्जिंग सिस्टम दिली असून त्यामुळे तुमचा फोन लगेच चार्ज होईल आणि तुम्हाला दीर्घकाळ चार्जिंगची चिंता होणार नाही.
प्रोटेक्शन: IPX6, IPX8 आणि IPX9 प्रोटेक्शन रेटिंग्समुळे पाणी आणि धुळीपासून संरक्षित असणारा फोन.
फिंगरप्रिंट सेन्सर: साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर जो अधिक सिक्योरिटी आणि सहज अॅक्सेस देईल.
नवीन व्हाईट एडिशन
सध्या एक नवीन व्हाईट एडिशन ऑफर केली जाऊ शकते.जी फोनला आणखी आकर्षक बनवेल.
लाँच होण्याची वेळ आणि किंमत
फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये लाँच होणारा OPPO Find N5 सध्या जास्त किमतीत असले तरी त्याच्या अविश्वसनीय वैशिष्ट्यांमुळे स्मार्टफोन बाजारात एक गेम चेंजर ठरू शकतो.
तुम्हाला फोल्डेबल फोनमध्ये नवीन आणि अद्वितीय अनुभव हवं असल्यास OPPO Find N5 निश्चितच तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.जास्त खर्चाची चिंता सोडून त्याच्या शक्तिशाली फीचर्सचा आनंद तुम्ही घेऊ शकतात.