Oppo Tablet : Samsung, Xiaomi ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहे Oppo चा पहिला टॅबलेट; “या” दिवशी होणार लॉन्च

Ahmednagarlive24 office
Published:
Oppo Tablet(2)

Oppo Tablet : भारतीय अँड्रॉइड टॅबलेट मार्केटमध्ये सॅमसंगचे वर्चस्व आहे. यानंतर, Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडने बाजारपेठेत वर्चस्व गाजवले पण आता सॅमसंग, शाओमी आणि रियलमी यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी मार्केटमध्ये आता Oppo पुढे आला आहे. आता ओप्पो ब्रँडही भारतीय टॅबलेट बाजारात उतरणार आहे. Oppo चा पहिला टॅबलेट, Oppo Pad Air, उद्या म्हणजेच 18 जुलै 2022 ला लॉन्च होईल. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Oppo Pad Air ची किंमत

Oppo Pap Air भारतात 15,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर केली जाऊ शकते. अशी माहिती आहे की कंपनी सध्या एकाच स्टोरेज प्रकारात टॅब सादर करेल.

Oppo Pad Air चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Pad Air टॅबलेट 10.36 इंच डिस्प्ले साइजमध्ये सादर केला जाऊ शकतो. त्याचा स्क्रीन रिफ्रेश रेट 60Hz असेल. हा टॅब 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्यायासह दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 3 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट दिला जाईल. तसेच 512 जीबी मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा टॅब LPDDR4x रॅम सपोर्टसह दिला जाऊ शकतो.

टॅबमध्ये प्रोसेसर सपोर्ट म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच टॅब adreno 610 GPU सपोर्ट सह येईल. Oppo Pad Air च्या मागील पॅनल वर 8 मेगापिक्सेल कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा सपोर्ट दिला जाईल. टॅबलेट Android 12 आधारित कलर OS सपोर्टसह येईल.

ओप्पो पॅड एअर बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

पॉवर बॅकअपसाठी, टॅबलेटमध्ये 7,100mAh बॅटरी सपोर्ट दिला जाईल, ज्याला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांमध्ये टॅबमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ v5.1 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. फोन क्वाड स्पीकर सपोर्टसह डॉल्बी एटमॉस सपोर्टसह येईल. ओप्पो पॅड एअरसोबत ओप्पो पेन्सिल आणि स्मार्ट मॅग्नेटिक सपोर्ट दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe