OPPO Smartphone : Oppo ने भारतीय बाजारात आपला एक नवीन आणि जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ओप्पोने नुकसताच Oppo F25 Pro 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 2022 मध्ये लॉन्च झालेल्या Oppo F21 Pro 5G ला रिप्लेस करेल.
लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिझाइन, मीडियाटेक प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले, फास्ट चार्जिंग सपोर्ट असे अनेक खास फीचर्स आहेत. आज आपण त्याच्या खास स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग…
Oppo F25 Pro 5G ची किंमत
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo F25 Pro 5G च्या 8GB 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे आणि 8GB 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत रुपये 25,999 आहे. हा स्मार्टफोन दोन रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन प्री-ऑर्डरसाठी देखील उपलब्ध असेल आणि 5 मार्चपासून विक्रीसाठी बाजरात उपलब्ध होईल.
Oppo F25 Pro 5G चे खास स्पेसिफिकेशन्स
Oppo F25 Pro 5G मध्ये 2412 x 1080 पिक्सेल (FHD), 394 PPI आणि 10-बिट कलर डेप्थसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले HDR10 कंटेंट आणि 1100 nits लोकल पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये LPDDR4x रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14 वर काम करतो.
कॅमेरा
या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या मागील बाजूस 64 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड युनिट आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो स्नॅपर समाविष्ट आहे. यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल सिम, 5G, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2, GNSS आणि USB टाइप-सी यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.