Realme 11 Pro 5G : जर तुम्ही स्वस्तात भन्नाट फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला आता Amazon वर उपलब्ध असणाऱ्या सेलचा लाभ घेऊन शानदार फोन खरेदी करता येईल.
रियलमीने काही दिवसांपूर्वी आपला Realme 11 Pro 5G हा फोन लाँच केला होता. आता त्यावर खूप मोठी सवलत मिळत आहे. तुम्हाला 200MP दमदार कॅमेरा असणारा स्मार्टफोन 26750 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येईल.
स्वस्तात खरेदी करा हा स्मार्टफोन
हा Realme 11 Pro 5G फोन आहे, जो नुकताच कंपनीकडून शानदार फीचरसह लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला Amazon वरून अवघ्या 29,550 रुपयांना खरेदी करता येईल. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण Amazon वर उपलब्ध असणाऱ्या या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला हा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करता येईल.
आता तुम्हाला Amazon वर उपलब्ध असणाऱ्या बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत सवलत घेता येईल. त्यानंतर या स्मार्टफोनची किंमत 27,550 रुपये असणार आहे. तसेच या स्मार्टफोनवर एक दोन हजार नाही तर एकूण 26,750 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. म्हणजे तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदीवर एकूण 26 हजार रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.
समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता. परंतू हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची किंमत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी, Amazon वर जाऊन सर्व ऑफरचे तपशील पूर्ण जाणून घ्या.
खासियत
Realme च्या या शानदार स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह 950 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. कंपनीचा हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करत असून त्यात MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर त्यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले आहे.
तर फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 200-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला असून हा स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करेल.