Realme 11 Pro Series : मस्तच.. ऑफर असावी तर अशीच! Realme 11 Pro सीरीजवर मिळत आहे 4499 रुपयांचे स्मार्टवॉच मोफत, पहा ऑफर

Realme 11 Pro Series

Realme 11 Pro Series : अल्पावधीतच स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने मार्केट आणि ग्राहकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये चांगली मागणी असून कंपनी इतर स्मार्टफोन निर्मात्या कंपन्याना टक्कर देत असते.

अशातच आता कंपनी Realme 11 Pro सीरीज लाँच करणार आहे. ज्यात Realme 11 Pro आणि Realme 11 Pro + स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. ही सीरीज 8 जून रोजी केली जाणार आहे. दरम्यान यावर 4499 रुपये किमतीचे स्मार्टवॉच मोफत दिले जाणार आहे.

टिप्स्टर सुधांशू अंभोरे यांच्याकडून Realme 11 Pro सीरीजच्या अधिकृत लॉन्चपूर्वी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे, ज्यात मोफत स्मार्टवॉचची चर्चा समोर आली आहे. याबाबत टिपस्टरकडून एक पोस्टर जारी करण्यात आले आहे, यात 4,499 रुपये किमतीचे स्मार्टवॉच मोफत देण्यात येत आहे. परंतु ग्राहकांना यासाठी स्मार्टफोनची प्री-बुकिंग करावी लागणार आहे, जी 8 जून ते 14 जूनपर्यंत चालणार आहे. असे जरी असले तरी अजूनही कंपनीकडून याला कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.

जाणून घ्या Realme 11 Pro चे स्पेसिफिकेशन

कंपनीकडून यापूर्वीच Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन आधीच समोर आले आहे. कंपनीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिले आहे. यात, 120Hz चे रिफ्रेश दर FHD + रिझोल्यूशनसह दिसतील. या दोन्ही स्मार्ट फोनमध्ये डायमेन्सिटी 7050 चिपसेट वापरण्यात येणार आहे.

रॅम आणि प्रकार

Realme 11 Pro हा फोन बाजारात तीन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात येईल, याचे स्टोरेज 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असणार आहेत. तसेच Realme 11 Pro + दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात येईल, जे 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असणारे फोन असतील. कंपनीच्या या सीरीजचे दोन्ही फोन Android 13 OS सह Realme UI 4.0 वर काम करू शकतात.

Realme 11 Pro कॅमेरा

कंपनीच्या Realme 11 Pro फोनमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसणार आहे, यात 100MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असू शकतो. तसेच यात 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे.

Realme 11 Pro+ कॅमेरा

या Realme फोनमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे, यात 200MP कॅमेरा देण्यात येणार आहे. तर, दुय्यम कॅमेरा 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे आणि तिसरा सेन्सर 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असणार आहे. इतकेच नाही तर यात 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe